दोन्ही राष्ट्रवादीमधील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला; बैठकीनंतर निघाला तोडगा, तर दुसरीकडे अद्याप भाजप अनब शिवसेनेच्या युतीचं चित्र अस्पष्ट

पुणे:- पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने निर्माण झालेला दोन्ही राष्ट्रवादीमधील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला असल्याची माहिती समोप आली आहे. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समोपचाराने तोडगा निघाला आहे. दुपारी तीन नंतर आमच्या जागांची संख्या क्लियर होईल.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी मिळून १६५ जागावर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी युतीबाबत माहिती देताना सांगितलं की, दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना एकाच प्रभागातून अर्ज दिला होता, पण आता ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्याला तिथे संधी दिली जाणार आहे.

दोन्ही पक्षाचे नेते आज बैठकीतहोते, चर्चेनंतर हा निर्णय घेतील. ९ ठिकाणी उमेदवारी अर्ज आहेत. जिथे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी भरले आहेत अशा उमेदवारांसोबत चर्चा होईल. आम्ही १२५ आम्ही एबी फॉर्म दिलेले आहेत. त्यांनी ३५ च्या वरएबी फॉर्म दिले होते. राष्ट्रवादी दोन्ही आणि खरात गट अशी युती असेल, असंही सुनील टिंगरे यांनी माहिती देताना सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *