२९ नक्षल पीडित कुटुंबांना मिळाली शासकीय नोकरी; नियुक्तीपत्रही दिलं, कुठल्या पदावर संधी?

गडचिरोली:नक्षलवादामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने नववर्षाच्या सुरुवातीलाच एक महत्त्वपूर्ण निर्णय अंमलात आणला. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या पुढाकारातून नक्षलपीडित कुटुंबातील २९ तरुणांना शासनसेवेत सामावून घेण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत या सर्व कुटुंबातील सदस्यांना शिपाई पदावर सरकारी नोकरीच्या (गेल) नियुक्तीपत्रांचे आज वितरण करण्यात आले. त्यामुळे, कुटुंबातील सदस्य गेल्याचं दु:ख मनी असतानाही, सरकारने अश्रू पुसण्याचं काम केल्याची भावना उपस्थितांच्या मनात होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात स्थैर्य आणि आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. जिल्ह्यात नक्षलवादी हिंसाचारात गोपनीय माहितीदारांची हत्या झालेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासन निर्णयान्वये अशा कुटुंबातील एका सदस्याला शासनसेवेत सामावून घेण्याची तरतूद आहे. त्या निर्णयानुसार, येथील जिल्हाधिकाऱ्यांना आज २९ कुटुंबीयांच्या जीवनात स्थैर्य देत पीडित कुटुंबीयांचे सांत्वनकरण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *