एकसंघ नियंत्रण आराखड्यामुळे नागझिऱ्यात पर्यटन वाढणार

राकेश बैस ,साकोली (दै. लोकजन) :- नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या ‘एकसंघ नियंत्रण’ आराखड्याला राज्य शासनाने अलीकडेच मंजुरी दिली. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाचे कोअर (गाभा) आणि बफर क्षेत्र हे दोन्ही भाग थेट नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिपत्याखाली आले आहेत.

व्याघ्र प्रकल्पातील संपूर्ण अधिकार आल्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या पर्यटन प्रवेशद्वारांशिवाय नवीन पर्यटन प्रवेशद्वार तयार केले जाणार आहेत. त्यातून रोजगारनिर्मीतीही होणार आहे. त्यामुळे लवकरच या व्याघ्र प्रकल्पाला अच्छे दिन येणार आहेत. आता संपूर्ण १३०१.८८३ चौ. कि. मी. क्षेत्राचे व्यवस्थापन आणि नियंत्रण थेट व्याघ्र प्रकल्पाच्या हाती आले आहेत. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रसंवर्धनासोबतच पर्यटनासाठी अधिकाधिक सुविधा निर्माण केले जाणार आहेत. ज्या ठिकाणी वाघांची लोकेशन सतत असते, त्याठिकाणी नवीन पर्यटन प्रवेशद्वार तयार करण्याचे नियोजन केले जातआहे. त्याठिकाणी नवीन सफारी, नव्या रस्त्यांची निर्मातीही केली जाणार आहेत. त्यातून रोजगारनिर्मीतीही होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. एकसंघ नियंत्रण मिळाल्यानंतर कुठे कुठे नवीन पर्यटन प्रवेशद्वार तयार करता येईल, याचे सर्व्हेक्षण नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प विभागाकडून सुरू करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *