बाल वैज्ञानिकांनी जिल्ह्याचे नाव देशपातळीवर न्यावे
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- बालवैज्ञानिकांनी आईवडिल, शिक्षक व मोठ्यांनी सांगितलेल्या सुचनांचे पालन करावे. तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांचा वापर करून व नवनवीन उपक्रम राबवून जिल्ह्याचे नाव देशपातळीवरच नाही तर जगात प्रसिद्ध करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले.
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने विनोद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिल्ली (आंबाडी) येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व जिल्हास्तरीय उल्लास मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी वरील प्रतिपादन केले. अध्यक्षस्थानी जि. प. समाजकल्याण सभापती सौ. शितल राऊत ह्या होत्या.
यावेळी जि. प. शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर, जि. प. शिक्षण समिती सदस्य मोहन पंचभाई, जि. प. सदस्य सौ. अनिता भुरे, भंडारा पं. स. सभापती सौ. कल्पना कुर्झेकर, पं. स. सदस्य प्रशांत खोब्रागडे, सिल्लीचे सरपंच सौ. सुचिता पडोळे, स्वागताध्यक्ष विनोद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिल्लीचे प्राचार्य दादाराव मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी मनिषा गजभिये यांनी केले. आभार प्राथमिक शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांनी आभार मानले. सर्व उपशिक्षणाधिकारी, सातही तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक रविंद्रमाडेवार, भंडारा जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद सेलोकर उपस्थिती होते. संचालन प्रा. जगदिश ब्राम्हणकर व प्रा. पुजा हारगुडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. अतिशय मोलाचे परिश्रम घेतले.









