साकोली न. प. काँग्रेस गटनेता म्हणून संदीप बावनकुळे यांची निवड
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- नगरपरिषद साकोली/ सेंदूरवाफा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या निवडून आलेला सदस्य तसेच मान्यवराच्या बैठकीत नवनिर्वाचित सदस्य संदीप बावनकुळे यांना गटनेता म्हणून निवड करण्यात आली यावेळी प्रामुख्याने उपस्थित साकोली विधानसभेचे आमदार नानाभाऊ पटोले, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहन भाऊ पंचभाई, तालुका अध्यक्ष अशोक कापगते, हरगोविंद भंेडारकर, उमेश भेंडारकर व नवनिर्वाचित सदस्य कुणाल राऊत, वैशाली लांजेवार, त्रिवेणी चौधरी, सायली दोनोडे, स्मिता सिडाम, निर्मला नंदेश्वर यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे नगरपरिषद साकोली/ सेंदूरवाफा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे सात निवडून आलेले सदस्यांची संयुक्त “साकोली/ सेंदुरवाफा लोकप्रिय विकास आघाडी’ची स्थापना करण्यात आली यांच्या मान्यतेसाठी सर्व नवनिर्वाचित सदस्य (३१ डिसे.) बुधवार ला भंडारा येथे जिल्हाधिकारी श्री. सावन कुमार व निवडणूक अधिकारी करणकुमार चौव्हाण यांची भेट घेऊन सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्यासह पत्र सादर करण्यात आले.









