समाज व्यसनमुक्त हीच आजच्या काळाची गरज:सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील
गोंदिया:- “आजचा तरुण आणि आपला समाज विविध प्रकारच्या व्यसनांच्या विळख्यात अडकत चालला आहे. नशा ही केवळ अमली पदार्थांचीच नसते, तर ती सत्ता, संपत्ती आणि जातीपातीचीही असते. या सर्व प्रकारच्या नशा समाज पोखरत आहेत. जर आपल्याला सशक्त भारत घडवायचा असेल, तर व्यसनमुक्त समाज निर्माण करणे हौच काळाची गरज आहे,” असे परखड प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केले.
गोंदिया येथील श्री गुर्जर क्षत्रिय समाज हॉलमध्ये बुधवार ३१ जानेवारी रोजी’ श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था’ आयोजित “संविधान जागर अभियान’ व “व्यसनमुक्त पहाट २०२६’ या तीन दिवसीय महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी आपल्या भाषणात संविधान आणि भारतीय संत परंपरा यांचा अतूट संबंध अधोरेखित केला, ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना भारतातील महान संतांच्या आणि महापुरुषांच्या शाश्वत विचारांना त्यात सर्वोच्च स्थान दिले आहे. संविधानाचा प्रचार आणि प्रसार हा केवळ कायद्याची माहिती म्हणून न होता, तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्हायला हवा. मानवी बुद्धिमत्ता अफाट आहे, परंतु आपण आपल्या विचारांना कल्पनेत आणि अंधश्रद्धेत अडकवून ठेवले आहे.
स्वर्गनरकाच्या काल्पनिक संकल्पनांपेक्षा वैज्ञानिक सत्य स्वीकारून संविधानातील समता आणि बंधुता जपणे महत्त्वाचे आहे. या नशेमुळे माणुसकी नष्ट होते. शोषणाचे मार्गः ओपर्यंत आपण समाजातील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक शोषणाचे मार्ग बंद करत नाही, तोपर्यंत व्यसनमुक्तीची लढाई पूर्ण होणार नाही. संतांनी आपल्याला समतेचा मार्ग दाखवला, परंतु आज समाजात जी विषमता दिसत आहे, ती आपल्या महापुरुषांच्या स्वप्नातील नव्हती.व्यसनाधीनता विनाशाचे मूळ व्यसनमुक्ती या विषयावर बोलताना त्यांनी अत्यंत गंभीर बाबींकडे लक्ष वेधले. पाटील म्हणाले:नशेचे विविध प्रकार: समाज केवळ दारूच्या नशेला व्यसन मानतो, परंतु सत्तेची नशा, जातीचा अभिमान आणि पैशाचा गर्व ही त्याहूनही भयंकर व्यसने आहेत.









