पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
पुणे:- पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत भाज आणि शिवेसना यांच्यातील जागा वाटपाची चर्चा सुरुच राहिलेली. दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार असं नेत्यांनी सांगितलं तरी प्रत्यक्षात चित्र वेगळंच दिसायला मिळत आहे. पुण्यात भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध महाविकासआघाडीतील काँग्रेस, शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित असं चित्र आहे. म्हणजेच पुण्यात थेट दोन आघाड्यांमध्ये निवडणूक होणार नसून बहुरंगी लढती होणार आहेत.









