नववर्षाच्या पूर्वसंध्येला तळीरामांवर “वॉच’
काशीनाथ ढोमणे: भंडारा- वर्षाच्या अखेरीस म्हणजेच ३१ डिसेंबर “थर्टी फस्ट’ ला तळीरामांवर पोलिस प्रशासनाची “वाच’ राहणार असून दारू पिवून वाहन चालविणाऱ्यांवर तसेच चेहऱ्यावर स्कार्प बांधून स्टंटबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने पहाटे पाचपर्यंत “थर्स्टी फस्ट’ साजरा करण्याची परवानगी दिली असली तरी मोठया प्रमाणात बनावट दारू बाजारात विक्रीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वांनाच आता नववर्षाचे वेध लागले असले तरी उत्साही तरूण व मद्यपीमुळे या उत्साहाला गालबोट लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.
दारू पिवून वाहन चालविणाऱ्यांमुळे भिषण अपघात सुध्दा घडले आहेत. त्यामुळे या प्रकारावर मात करण्यासाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने दक्षता म्हणूनही खबरदारी घेण्यात येत आहे. वर्षाचा शेवट म्हणजेच ३१ डिसेंबर “थर्टी फस्ट’, नववर्षाच्या पुर्वसंध्येला होणाऱ्या पार्टीसह तळीरामांवर पोलिस प्रशासनाची “वाच’ राहणार असून दारू पिवून वाहन चालविणाऱ्यांवर तसेच चेहऱ्यावर “स्कार्प बांधून स्टंटबाजी’ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हयात विशेषतःशहरात अनेक ठिकाणी “फिक्स पाँईट’ राहणार असून “ड्रंकन ड्राईव्ह’ मोहीम राहणार आहे. विशेष म्हणजे नवीन वर्षाच्ो स्वागत करण्यासोबतच मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ३१ डिसेंबर औचित्य “थर्टी फस्ट’ नागरिक मोठया प्रमाणात जल्लोष साजरा करतात.
यादिवशी काही नागरिक आपल्या कुटूंबीयांसोबत फटाक्यांची सुध्दा आतीषबाजी करून नववर्षाचे स्वागत करतात. बाहेर जेवणाचा आस्वाद घेतात. तर काही नागरिक याच दिवशी मोठया प्रमाणात मद्य रिचवतात. नववर्षाचे स्वागत हॉटेल व बारमध्ये मद्य रिचवून व जेवण करून करण्याची संस्कृती शहरात गेल्या काही वर्षापासून रूजली आहे. त्यामुळे शहरासह बाहेर असलेल्या हॉटेल आणि बारमध्येही त्यादृष्टीने व्यवस्था केली जाते. हॉटेलची सजावट करून संपुर्ण परिसरामध्ये रोषणाई सुध्दा केली जाते. मात्र या दिवशी काही उत्साही तरूण नागरिक चांगलाच धिंगाणा घालण्याचीही अनेक उदाहरणे आहे. मद्यपी अवस्थेत अनेक हाणामाऱ्या सुध्दा होतात. अनेक अपघात घडण्याची सुध्दा शक्यता असते. त्यामुळे नववर्षाचे स्वागत व मावळत्या वर्षाला निरोप शांततेने देता यावा, याकरिता पोलिस प्रशासनाच्यावतीने दक्षता/खबरदारी घेण्यात येत असते.









