नगर परिषद निवडणुकीत जनतेने दिली युवकांना साथ

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- नुकताच पार पडलेल्या साकोली सेंदुरवाफा नगरपरिषद निवडणुकीत जनतेने त्याच त्या चेहऱ्यांना नाकारले असून या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात युवा वर्गाला जनतेने निवडून दिले. यात काँग्रेसचे कुणाल राऊत, शिवसेनेचे पुष्कर करंजेकर, अपक्ष उमेदवार सोनू बैरागी तथा अपक्ष उमेदवार सपन कापगते या उच्चशिक्षित युवा वर्गाला जनतेने आपल्या खांद्यावर घेतले. अत्यंत चुरशीच्या या लढाईत अनेक दिग्गज पराभूत देखील झाले तर नवखे उमेदवार देखील निवडून आले. राजकारणाची कुठली पार्श्वभूमी नसताना सामाजिक कार्य, प्रभागातील नागरिकांची साथ, मित्रपरिवारची अहोरात्र मेहनतीच्या जोरावर या नवख्या उमेदवारांनी प्रस्थापितांना धूळ चारले. तिन्ही नगरसेवकांचा भंडाऱ्यात देखील बराच मित्रपरिवार आहे. या निवडणुकीत मित्र परिवार यांची मोलाची साथ लाभल्याने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *