सामाजिक न्याय भवनात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- राष्ट्रीय ग्राहक दिन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या वतीने आज दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी सामाजिक न्याय भवन च्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संबंधितानी बोलत होते.सुरक्षित खरेदी, स्पष्ट माहिती, निवडीचा अधिकार, तक्रार निवारण आणि न्याय मिळण्याचा हक्क हे सर्व ग्राहकांना माहिती असले पाहिजे. जेव्हा आपण सजग ग्राहक होतो, तेव्हा बाजार तितकाच पारदर्शक आणि जबाबदार बनतो.

हा दिवस राष्ट्रपतींनी ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ ला मान्यता दिल्याच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जातो, ज्याने देशात संरचित ग्राहक हक्क व्यवस्थेचा पाया घातला. गेल्या काही वर्षांत, हा दिवस सुधारणांचे मूल्यांकन करण्यासाठी, जागरूकता वाढवण्यासाठी आणि तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करण्यासाठी एक व्यासपीठ बनला आहे.असे कार्यक्रमाचे सदस्य सचिव तथा जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी नरेश वंजारी बोलत होते. या कायद्यामुळे प्रथमच ग्राहकांना कायदेशीर संरक्षण मिळाले. ग्राहक संरक्षण म्हणजे ग्राहकाचे हक्क व हितसंबंधाचे संरक्षण होय. आजच्या उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाच्या युगात बाजारपेठेत वस्तू आणि सेवांची प्रचंड विविधता दिसून येते.

अशा परिस्थितीत ग्राहक अनेकदा चुकीच्या जाहिराती, भेसळ, निकृष्ट दर्जाच्या वस्तू, जास्त दर आकारणी, ऑनलाईन फसवणूक, तसेच विक्रीपश्चात सेवांमधील त्रुटींना बळी पडतो. त्यामुळे ग्राहक हक्कांची माहिती असणे आणि त्यांचा प्रभावी वापर करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ च्या जागी सुधारित ग्राहक संरक्षण कायदा,२०१९ लागू करण्यात आला. या कायद्यानुसार ई-कॉमर्स व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यात आले.तसेच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण २०२० ची स्थापना करण्यात आली.या कायद्या नुसार दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कठोर कारवाई तरतूद करण्यात आली. ऑनलाईन तक्रार नोंदणी व जलद निवारण व्यवस्था यामुळे ग्राहकांना अधिक प्रभावी संरक्षण मिळाले, असे बोलत होते.

केंद्र व राज्य शासनामार्फत ग्राहक न्याय मंच, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन १९१५, ई-दाखिल पोर्टल, तसेच विविध जनजागृती मोहिमा राबवण्यात येतात. ङ्गजागो ग्राहक जागोङ्घ हा उपक्रम ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करतो. हक्कांसोबतच ग्राहकांनी स्वतःची कर्तव्येही ओळखणे गरजेचे आहे. ग्राहकांनी खरेदी करताना बिल व पावती घेणे,उत्पादनावरील माहिती काळजीपूर्वक वाचणे,भेसळ व फसवणूक आढळल्यास तक्रार करणे, पर्यावरणपूरक व जबाबदार खरेदी करणे. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, सहकारी संस्था, स्वयंसेवी संघटना यांच्यामार्फत व्याख्याने, चर्चासत्रे, निबंध स्पर्धा, जनजागृती रॅली आयोजित केल्या जातात. यामागचा उद्देश म्हणजे जागृत, सजग आणि जबाबदार ग्राहक घडवणे. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून, प्रत्येक नागरिकाने स्वतःचे हक्क ओळखून त्यांचे संरक्षण करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. जागृत ग्राहक हीच सशक्त अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली आहे, म्हणूनच ग्राहक जागरूकता ही काळाची गरज आहे.असे प्रमुख अतिथी तथा अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सतीश आनंद सप्रे यांनी बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *