मतदान यंत्रणावर नाव नसल्याप्रकरणी न्यायालयात जाणार
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार करुणा राऊत यांच्या मशीनची मोजणी सुरू असताना एका ग्रुपच्या मशीनवर पाच नंबरवर त्यांचे नाव आणि सहा नंबरवर नोटाचाही बटन ऑप्शन गायब होता. तरीपण त्यांचा निवडणूक निकाल निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केला.
याप्रकरणी आम्ही न्यायालयात जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी विश्रामगृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली. चरण वाघमारे पुढे म्हणाले, मतदान यंत्रावर उमेदवारांचे नाव नसणे हे देशातील पहिलेच प्रकरण आहे. आमच्या उमेदवारांनी माझा नाव मशीन वरून गायब कसा झाला आणि त्या मशीनवर मला किती मतं मिळाले याची माहिती मागितली असता निवडणूक अधिकारी सांगू शकले नाही.
रात्री बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणीआपला निकाल मागण्यासाठी करुणा राऊत आणि आमचे मतमोजणी प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. पण रात्रीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केलेला नाही. रात्रीच जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाला मेल पाठविला. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत पण आमच्या उमेदवाराला न्याय मिळाला पाहिजे यासाठी शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. मतदानाच्या दिवशी मतदान यंत्रावर उमेदवाराचे व नोटा चे नाव होते. मतदान केंद्रावर नगराध्यक्ष पदाला मतदान करायसाठी एक मशीन होती आणि नगरसेवकांची एक मशिन होती. त्या दोन्ही मशीनच्या मतदानाच्या कलेक्शन सेंटर एकच होता. कलेक्शन संेटर ओपण केला तर कोणत्या उमेदवाराला किती मत मिळाली याची माहिती होईल. यासाठी कनेक्शन सेंटर ओपण करणे आवश्यक आहे. सात दिवसाची आत याच्या निघताना लागला पाहिजे.
कलेक्शन सेंटरमध्ये जाऊन कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली त्यामध्ये करुणा राऊतला किती मत मिळाली हे जोपर्यंत सांगत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्त पडणार नाही. अन्यथा त्या प्रभागाच्या निवडणूक पुन्हा घेतली पाहिजे. प्रत्येक प्रभागांमध्ये अशा पद्धतीने जर सेटिंग झाली असेल तर निवडणूक प्रक्रिया पुन्हा पार पडली पाहिजे अशी आमची शासनाला आणि निवडणूक आयोगाला मागणी आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये जेवढे अधिकारी असतील त्या सगळ्यांच्याही शोध घेऊन त्यांच्या जबाबदारी निश्चित केली पाहिजे. मतमोजणीच्या वेळी सील ओपन केल्यानंतर काउंटिंगची बटन दाबण्यापूर्वी उमेदवाराच्या नाव आहे किंवा नाही नोटा चे नाव आहे किंवा नाही हे तपासल्याशिवाय निकाल जाहीर केल्या जात नाही. अशा परिस्थितीत कुठलीही तपासणी न करता कुठलीही खात्री न करता जे काही निकाल जाहीर केलेला आहे त्याचे आम्ही विरोधात आहोत.
केंद्रीय निवडणूक आयोगापासून राज्य निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे जर एका मशीनमध्ये अशा पद्धतीची जाणून-मधून सेटिंग झाली असेल एखाद्याला जिंकवण्यासाठी आणि दुसऱ्याला हरवण्यासाठी तर भंडारा शहराच्या सगळ्या मशीनची तपासणी केली पाहिजे अशी आमची मागणी असल्याचेही चरण वाघमारे म्हणाले. याप्रकरणी त्याच वॉर्डातील पराभूत उमेदवार ॲड. विनयमोहन पशिने हे सुद्धा न्यायालयात जाणार असल्याची माहिती चरण वाघमारे यांनी दिली. पत्रपरिषदेला मधूकर चौधरी, चंद्रशेखर भिवगडे, अजय मेश्राम, निलीमा रामटेके, करूणा राऊत, ज्योती मालोडे उपस्थित होते.









