डॉ. विजया नंदुरकर पवनी नगराध्यक्षपदी

दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पवनी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) डॉ. विजया नंदुरकर यांनी भव्य विजय संपादन केला आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवार भावना भाजीपाले यांचा ५७८ मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदाची खुर्ची खेचून आणली.

या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली. डॉ. विजया नंदुरकर यांनी पहिल्या क्रमांकाची मते घेत विजय मिळवला, तर भाजपच्या भावना भाजीपाले दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. शिवसेना (शिंदे गट) तिसऱ्या क्रमांकावर, तर काँग्रेसला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पवनी नगरपरिषदेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडीमध्ये संमिश्र कल पाहायला मिळत आहे. भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्ष म्हणून जनतेने डॉ. विजया नंदुरकर यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *