भंडारा, साकोली -भाजपाकडे, (अ.प.) तर तुमसरमध्ये अपक्षाकडे पवनी-राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष पदाची चाबी
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- ३ डिसेंबरपासून प्रतिक्षेत असलेला भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, साकोली-सेंदुरवाफा व पवनी नगरपालिकेचा निकाल आज घोषित झाला. भंडारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपाचे सौ. मधुरा मिलींद मदनकर, तुमसर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी अपक्ष सागर मनोहर गभने, साकोली -सेंदुरवाफा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपाचे सौ. देवश्री मनीष कापगते व पवनी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सौ. विजया राजेश नंदुरकर ह्या निवडून आल्या.
मतमोजणीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे राज्यात एकत्र असणाऱ्या सत्ताधारी व विरोधीअशा दोन्ही आघाड्या अर्थात महायुती व महाविकास आघाडी यातील मित्रपक्षांनी स्वतंत्र एकमेकांच्याच विरोधात निवडणूक लढविली. भंडारा नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या मधुरा मदनकर यांनी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री बोरकर यांना ४३९० मतांनी पराभव केला. मधुरा मदनकर यांना १८७२७ मत तर जयश्री बोरकर १४६७९ मत मिळाली. शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी ह्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. त्यांना १३१०३ मत मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुषमा साखरकर यांना४३९० मते मिळाली. भंडारा नगरपालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
भाजपाचे २३, काँग्रेसचे ४, शिवसेनेचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ३ नगरसेवक निवडून आले. निवडणूकीपूर्वी आ. नरेंद्र भोंडेकर यांचे खंदे समर्थर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्क असलेले जॅकी रावलानी हे भाजपात गेले होते. मात्र त्यांचा प्रभाग ४ मध्ये पराभव झाला. ३५ वर्षापासून नगरसेवकअसलेले विनयमोहन पशिने, बाबू बागडे यांचा पराभव झाला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे हे नगरसेवक म्हणून निवडून आले.
भंडारा नगरपालिकेत बहुतेक नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. उमेदवाराच्या विजयाची माहिती बाहेर पडताच मतमोजणी केंद्रासमोर समर्थकांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. प्रभाग ३ अ मधील एका ईव्हीएमवर मतमोजणी करतेवळी नगरसेवक पदाच्या उमेदवार करूणा राऊत यांचे नाव नसल्याने यावर आक्षेप घेण्यात आला होता. परिणामतः या प्रभागातील उमेदवाराच्या विजयाची घोषणा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानंतर घोषित करण्यात आली. सायंकाळी शहरातून उमेदवारांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.







