अजर्ुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात भव्य आयोजन; माजी मंत्री आणि आ.राजकुमार बडोले यांचा पुढाकार सांस्कृतिक महोत्सवाचे
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील अजर्ुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात भारतीय लोकसंस्कृतीचा वारसा जपणारा भव्य सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येत असून राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे हा पाच दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम सडक अजर्ुनी आणि अजर्ुनी मोरगाव येथे होणार आहे. या महोत्सवात १५० पेक्षा अधिक कलावंत सहभागी होणार असून, नृत्य, संगीत आणि कीर्तन अशा विविध कार्यक्रमांनी रंगणार आहे.
महोत्सवाची सुरुवात १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आशीर्वाद लॉन, सडक अजर्ुनी येथे होईल. पहिल्या दिवशी पावा यांचा लाइव्ह म्यूजिक आणि मेडिटेशनचा विशेष कार्यक्रम सादर केला जाईल. दुसऱ्या दिवशी २० डिसेंबर रोजी दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हा परिषद शाळा प्रांगण, अजर्ुनी मोरगाव येथे पारंपारिक नृत्य स्पर्धा होईल. २२ डिसेंबर रोजी शिवलीला पाटील यांचा सुश्रुत कीर्तनाचा कार्यक्रम रंगणार असून, महोत्सवाचा समारोप २३ डिसेंबर रोजी इंडियन आयडल फेम सवाई भट्ट यांचा लाईव्ह कॉन्सर्टने होईल. हा सोहळा भारतीय लोकसंस्कृतीचे विविध रंग उलगडणारा ठरेल. या महोत्सवात नागरिकांना सक्रिय सहभाग घेता येणार आहे. दांडिया आणि पारंपारिक नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकास ५१ हजार रुपये, द्वितीयास ४१ हजार रुपये, तृतीयास ३१ हजार रुपये तसेचपाच उत्तेजनार्थ बक्षिसे, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हा महोत्सव स्थानिक कलावंतांना व्यासपीठ देऊन संस्कृतीच्या जतनाला चालना देणारा ठरेल, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमामुळे अजर्ुनी मोरगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगीतप्रेमी आणि नृत्य रसिकांसाठी हा महोत्सव अविस्मरणीय ठरेल. या निम्मीतांन गोंदिया येथे होटेल एकतारा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
पत्रकार परिषदेला भाजप जिल्हा महामंत्री प्रशांत शहारे राष्ट्रवादी कांग्रेस अजर्ुनी मोरगांव तालुका अध्यक्ष लोकपाल गहाने सडक अजर्ुनी तालुका अध्यक्ष डॉ अविनाश काशिवार अजर्ुनी मोरगांव भाजप तालुका अध्यक्ष राघ्येशाम भेंडारकर केशोरी मंडल अध्यक्ष प्रकाश गहाणे स अजर्ुनी मंडल अध्यक्ष राजेश कढाने सौदड मंडल अध्यक्ष विलास बागडकर शिवसेना स अजर्ुनी तालुका विलास कागपते सामाजिक कार्यकर्ता राजकुमार बडोले फाऊंडेशनचे हितेश डोंगरे राजकुमार बडोले फाऊंडेशनचे राकेश धनंजय वैदे अजित मेश्राम भाजयुमो अध्यक्ष विवेक भेंडारकर सम्राट भिमटे सचिन कापगते कुनाल बडोले उपस्थित होते या कार्यकमाला मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन प्रशांत शहारे यांनी केले आहे.
सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन खा.प्रफुल पटेल यांच्या हस्ते सडक अजर्ुनी येथील आमदार संस्कृतिक महोत्सव चे उद्घाटन शुक्रवार १९ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजता स्थळआशीर्वाद लॉन सडक अजर्ुनी आणि जिल्हा परिषद शाळेचे प्रांगण अजर्ुनी मोरगाव येथे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे खासदार, कार्यक्रमाचे उद्घाटक इंद्रनील नाईक, राज्यमंत्री आणि पालकमंत्री, जिल्हा गोंदियास्वागताध्यक्ष राजकुमार बडोले माजी मंत्री, सा. न्याय आणि विशेष सहाय्यक, आमदार, अजर्ुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ, उपेंद्र कोठेकर विदर्भ केंद्रीय मंत्री, विजय रहांगडाले आमदार तिरोडा विधानसभा, लायकराम भेंडारकर अध्यक्ष जि.प.गोंदिया,परिणय फुके, आ.विधान परिषद, विनोद अग्रवाल आ. गोंदिया विधानसभा,वीरेंद्र अंजनकर गोंदिया-भंडारा समन्वयक,सीताताई रहांगडाले जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी गोंदिया, राजेंद्र जैन,आ.संजय पुराम आमगाव-देवरी विधानसभा, प्रेम रहांगडाले जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी गोंदिया, सुरेंद्र नायडू जिल्हाध्यक्ष शिवसेना गोंदिया यांच्या उपस्थितीत होणार आहे.







