झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत २ निर्णय

मुंबई:- राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १७ डिसेंबर रोजी दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, गडकिल्ल्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील ३९० राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यात येणार आहेत, यासंदर्भातही मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारके अतिक्रमण मुक्त राहावी व त्यांची ऐतिहासिकता अबाधित रहावी याकरिता सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची नेमणूक करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारके अतिक्रमण मुक्त राहावी व त्यांची ऐतिहासिकता अबाधित रहावी याकरिता सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची नेमणूक करण्याचा निर्णय १७ डिसेंबर रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या समितीमध्ये महसूल, ग्रामविकास, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वने आणि बंदरे विकास मंत्री तसेच वित्त, नियोजन, सांस्कृतिक कार्य विभाग, नगरविकास (१), गृह, महसूल, ग्रामविकास, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम विभाग वने, आणि बंदरे विकास विभाग सचिवांचाही समावेश या समितीमध्ये करण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम १४ (२) मध्ये सुधारणा करण्यास १७ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत आणि कालबध्द रितीने व्हाव्यात या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *