आ. राजू कारेमोरे यांची चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर सुटका

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर सत्र न्यायाधीश क्र. २ श्रीमती काळे यांच्या न्यायालयाने आ. राजू कारेमोरे यांनी सुटका केली आहे. सविस्तर असे की, दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी मोहाडी येथील काही पोलिसांनी तुमसरचे यासिन छवारे इतर काही लोकांना बेदम मारहाण केली होती. त्यामुळे आ. राजू कारेमोरे चौकशीकरीता पोलीस स्टेशन मोहाडी येथे गेले होते. त्या ठिकाणी पोलिसांशी त्यांचा वाद झाला होता. आमदार यांनी पोलिसांविरुद्ध रिपोर्टदिली होती.

यामुळे दोन दिवसानंतर पोलिसांनी “आमदार राजू कारेमोरे व इतर ५-६ लोकांविरुद्ध ठाण्यात येवून शिवीगाळ, धमकी दिली व शासकीय कामात अडथळा केला, असा गुन्हा नांेदविला होता. सदर प्रकरण दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी श्रीमती काळे, सत्र न्यायाधीश क्र. २ भंडारा यांच्या न्यायालयात निकाली काढण्यात आला. त्यामध्ये न्यायालयाने राजू कारेमोरे व इतर लोकांनी शिवीगाळी केल्यामुळे दोषी धरले व इतर आरोपातून मुक्त केले. तसेच कलम २९४, ५०४, १४३ भा. दं. वि. मध्ये दोषी धरून दोन वर्षाचे चांगले वर्तणूकीचे बंधपत्रावर सुटका केली. हे प्रकरण भंडारा जिल्ह्यात फारच गाजले होते. या प्रकरणात सरकार तर्फे ॲड. रमाकांत खत्री सरकारी अधिवक्ता तसेच आरोपीतर्फे ॲड. राकेश सक्सेना, ॲड. सौ. सोनाली अवचट, ॲड. सौ. रोहिणी रामटेके व ॲड. दिलीप भोयर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *