आय.टी.आय चा प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर ट्रेड करा, लाखो कमवा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा येथील प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर चे एक वर्षीय प्रशिक्षण घेऊन केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिकी संस्थान (सीपेट) चंद्रपूर येथे मशीन ऑपरेटर इंजेक्शन मोल्डिंग सहा महिन्याचा प्रशिक्षण घेऊन करारबंध असलेल्या ७८ कंपनी मधील यझाकी इंडिया प्रा.लिमिटेड वाघोली पुणे येथे २९ हजार ४०० इतक्या मानधनावरती बारा प्रशिक्षणार्थ्यांची निवड झाली या दरम्यान प्रविण बच्चाव हेड डायरेक्टर, सिपेट चंद्रपूर आणि पुष्कर देशमुख प्लेसमेंट अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. देशाच्या अर्थव्यवस्थेत, औद्योगिक क्षेत्रात, दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या प्लास्टिकला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध रोजगारभिमुखचालवण्याऱ्या जाणाऱ्या कोर्सेस पैकी जिल्हा आयटीआय मध्ये प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर हा एकमेव कोर्स चालवल्या जात आहे. याच एक वर्षीय कोर्सच्या माध्यमातून पूणे येथील नामवंत कंपनीत रोजगार मिळाल्याबद्दल प्रशिक्षणार्थी समाधान व्यक्त करत आहेत. तर यशाचे श्रेय प्रशिक्षणार्थ्यांनी संस्थेतील प्राचार्य, ट्रेड शिल्पनिदेशक, प्रविण बच्चाव हेड डायरेक्टर, सिपेट चंद्रपूर आणि पुष्कर देशमुख प्लेसमेंट अधिकारी यांना दिलेले आहे. दहावीला कमी टक्केवारी असल्याने कमी लेखल्या जाणाऱ्या आयटीआय ट्रेड ला प्रवेश घेतला पण हाच ट्रेड माझे भविष्य घडवेल हा कधीच विचार केला नव्हता. सरांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाने यश संपादन करता आले.
यश किटे- पी.पी.ओ.ट्रेड प्रशिक्षणार्थी आयटीआय.भंडारा. प्लास्टिक प्रोसेसिंग हा ट्रेड करून प्रशिक्षणार्थी स्वबळावरती स्वयंरोजगार, शासकीय व खाजगी कंपन्यांमध्ये रोजगार प्राप्त करू शकतात. आज हे आपण अनुभवत आहोत. नव्यानेच आयटीआय. ला रुजू होणे व शंभर टक्के प्रशिक्षणार्थी यांचा शंभर टक्के निकाल लावून त्यामधून बारा प्रशिक्षणार्थींना रोजगाराच्या संधी पर्यंत पोहचविणे हा एक जबाबदारी होती.
प्रशिक्षणार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे त्यांना रोजगार स्वरूप फळ प्राप्त झाले. ए. डी. दिघोरे ट्रेड शिल्पनिदेशक पी.पी.ओ. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा. आयटीआय. चे कोणतेही कौशल्य देणारे व्यवसायिक अभ्यासक्रमला कमी लेखल्या जावू नये. ट्रेड निर्देशकांनी प्रशिक्षणार्थ्यांवर घेतलेली मेहनत प्रशंसनीय आहे. नवप्रवेशित होणारे विद्यार्थी पी.पी.ओ. ट्रेड कडे आकर्षित होऊन जास्तीत जास्त प्रवेश घेतील व या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नव नवीन जास्तीत रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. व्ही.एम.लाकडे प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा.







