राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ५२३ प्रकरणे निकाली

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- दि. १५ राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा न्यायालय, भंडारा येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. लोकअदालतीचे उद्घाटन व अध्यक्षस्थान मा. श्री. राजेश अस्सर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण ४१८ प्रलंबित प्रकरणे तसेच १०५ पूर्वन्यायप्रविष्ट प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. अशा प्रकारे एकूण ५२३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

या लोकअदालतीमध्ये सर्व फौजदारी व दिवाणी न्यायालये, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय तसेच औद्योगिक न्यायालयात प्रलंबित असलेली एकूण १०,०२८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २० मोटार अपघात दावे, २९ एन. आय.ॲक्ट प्रकरणे, १२० रक्कम वसुली प्रकरणे, ५ कौटुंबिक वाद, २०७ फौजदारी तडजोडपात्र व इतर फौजदारी प्रकरणे तसेच १८ दिवाणी स्वरूपाची प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोकअदालतीत पॅनल प्रमुख म्हणून मा. भारती व्ही. काळे, जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, भंडारा; पी. एल. गुप्ता, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर); मा. श्री. ए. जी. मस्के, द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश (जलदगती न्यायालय); श्री. जे. आर. घाडगे, चतुर्थ सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर); तसेच मा. व्ही. व्ही. वाघमारे, द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी यांनी काम पाहिले. पॅनल सदस्य म्हणून ॲड. दैवता कांबळे, ॲड. सोनाली तरारे, ॲड. विरेंद्र सतदेवे, ॲड. किरण येवले व ॲड. नरेंद्र मडावी यांनी सहकार्य केले.

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून मोटार अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या पत्नी व मुलांना नुकसानभरपाई लवकर मिळण्यास मोठा दिलासा मिळाला. न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित राहणाऱ्या प्रकरणांमुळे पीडित कुटुंबांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेता, लोकअदालतीद्वारे तातडीने न्याय मिळाला. जिल्हा न्यायालय, भंडारा येथे मोटार अपघात दाव्यांसाठी स्वतंत्र पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. या लोकअदालतीत एकूण २२ मोटार अपघात प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये एका प्रकरणात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू २६ ऑक्टोंबर २०१५ रोजी झाला होता. सदर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *