तीन दिवसांची भव्य हनुमान भूमिपूजन माजी आ. राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत संपन्न कथास्थळाच्या मंडपाचे

गोंदिया :- गोंदिया येथील डी.बी. सायन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित तीन दिवसांची भव्य हनुमान कथास्थळाच्या मंडपाचे भूमिपूजन सोमवार १५ डिसेंबर रोजी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत कथास्थळी हनुमंताची पूजा आणि आरती करून कथास्थळाच्या मंडपाचे भूमिपूजन संपन्न करण्यात आले.या प्रसंगी तिरखेडी आश्रमचे महाराज, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रफुल अग्रवाल, अरुण दुबे, नरेश महेश्वरी, शंकरलाल अग्रवाल, अशोक अग्रवाल, निखिल जैन आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

या प्रसंगी हनुमान चालीसा पाठचे आयोजन ही करण्यात आले होते. गोंदिया शहरात धार्मिक आणि भक्तीमय वातावरणात एक भव्य कार्यक्रम होणार आहे. खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि वर्षाताई पटेल कुटुंब २१ ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत तीन दिवसांच्या हनुमान कथेचे आयोजन करत आहेत.या कार्यक्रमादरम्यान सदगुरु श्री रितेश्वरजी महाराजांच्या उपस्थितीत अनेक महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत. या प्रमुख कार्यक्रमांची रूपरेषा अशा प्रकारे राहणार आहे.

२० डिसेंबर रोजी रितेश्वरजी महाराज यांचे विमानाने बिरसी विमानतळावर आगमन होईल. त्याच दिवशी सायंकाळी रितेश्वरजी महाराज पत्र परिषदेत हनुमंत कथा आणि इतर माहिती माध्यमांना देण्यात येईल. २१ डिसेंबर २०२५: रोजी दुपारी १:३० वाजता कथेची सुरुवात एका भव्य मिरवणुकीने होईल, जी दुर्गा चौकातील माँ जगदंबा धाम येथून सुरू होईल. यात गोंदियातील विविध सामाजिक व धार्मिक संगठन सहभागी होऊन कथास्थळी दाखल होणार. रात्री ८:०० वाजता: अखिल भारतीय कवी संमेलन डी.बी. सायन्स कॉलेज कॅम्पसमध्ये होत आहे. देशभरातील प्रसिद्ध कवी त्यांच्या कलाकृती सादर करतील.

२२ डिसेंबर २०२५: रोजी दुपारी १२:०० ते २:००: सदगुरु श्री रितेश्वरजी महाराज विद्यार्थ्यांसोबत ते संवाद साधतील.यासाठी एनएमडी कॉलेज कॅम्पसच्या सभागृहात “युवा महोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थी नोंदणी करून नोंदणी करू शकतात. त्यानंतर दुपारी ३ ते ६ कथा सांगितली जाईल. रात्री ८:३० ते १०:३०: अहमदाबाद येथील प्रसिद्ध भक्तिमय सुंदरकांड गायक श्री धवल मानस यांचे सुंदरकांडचे भावपूर्ण सादरीकरण होईल.

मंगळवार २३ डिसेंबर २०२५ ७.३० वाजता: कार्यक्रम संपेल या कार्यक्रमाची सुरुवात दिपदान आणि दिव्य प्रकाशाच्या प्रज्वलनाने होईल. रजेगाव येथील कोरणी घाटाच्या पवित्र तीरावर रंगीत रोषणाई, आतषबाजी आणि धार्मिक स्तोत्रांनी कार्यक्रमाचा समारोप होईल.या संपूर्ण भक्तीपर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुण्य लाभ घ्यावा अशी विनंती हनुमान कथा आयोजन समितीने सर्व धार्मिक भक्तांना केली आहे. बुधवार २४ डिसेंबर रोजी सद्गुरु श्री रितेश्वरजी महाराज भंडारा जिल्ह्यातील चांदपूर येथे जागृत हनुमंताचे दर्शन घेऊन तिथून नागपूर नी वृंदावन धाम करिता विमानाने प्रस्थान करतील.ही माहिती माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सोमवारी भूमिपूजन संपन्न झाल्यानंतर दिली. शेवटी महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *