राज्यस्तर शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत नूतन कन्या शाळा महाराष्ट्रात द्वितीय
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तर शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल नागपूर येथे दिनांक २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ ला १९ वर्षाखालील मुलींच्या गटातील स्पर्धा संपन्न झाल्या या क्रीडा स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करताना नूतन कन्या शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय भंडारा संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून राज्यस्तर सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. व नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता समीक्षा भुरे, श्वेता देसकर यांची निवड झाली असून दोन्ही खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार. संघात समीक्षा भुरे, श्वेता देसकर, दिव्या शेंद्रे, दिवेश्री देशकर, राणू निनावे, स्वराली तायवाडे, वंशिका गाते, अंसिका सूर्यवंशी, प्रिया लोले, अंजली सेलोकर, हर्षनू बारस्कर, आर्या सेलोकर, पल्लवी बाभरे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
संघाला क्रीडा शिक्षक श्री बेनीलाल चौधरी, शुभांगी येनोरकर, अंकित भगत यांचे प्रशिक्षण लाभले. संघाच्या विजयाबद्दल संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट एम.एल.भुरे, सचिव शेखर बोरसे, प्राचार्या नीलू तिडके, उपमुख्याध्यापक कैलास कुरंजेकर, पर्यवेक्षिका श्रद्धा रामेकर, लता ब्राह्मणकर, रेखा पणके, मोहन दाढी, अरुण बांडेबुचे, सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव दीपक सोनटक्के, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाडे व सर्व शिक्षक कर्मचारी वृंद यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.







