खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्या मध्यस्थीने जलसमाधी आंदोलन तूर्तास मागे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाच्या अन्यायपूर्ण धोरणामुळे प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेत ११ डिसेंबर रोजी वैनगंगा नदीवर सुरु केलेले जलसमाधी आंदोलन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेच्या आश्वासनानंतर तात्पुरते मागे घेण्यात आले होते. मात्र सदर सभेतून कोणताही मार्ग न निघाल्याने संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी १३ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता भंडारा जवळच्या कारधा येथे वैनगंगा नदीत बसून आंदोलन तीव्र केले होते. अखेर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या मध्यस्थीनंतर हे जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले.

महसूल मंत्री यांनी आपल्याला नेहमीसारखा गुंगारा.दिवसाचे कळताच ११ प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी यांनी विधानभवन ते कारधा नदीत तात्काळ गाडून जलसमाधी घेण्यासाठी प्रकल्पग्रस्तपैकी भाऊ काटोरे, प्रमिला शहारे, मनीषा भांडारकर, दिलीप म्हावरे, अतुल राधोये यांनी रात्री तब्बल सहा तास कडाक्याच्या थंडीत तब्बल सहा तास बसून आपला तीव्र निषेध शासन-प्रशासन समोर व्यक्त केला. याची सूचना खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कानी पडताच त्यांनी आंदोलन स्थळ गाठले. खासदारांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जलसंपदा मंत्री आणि अनेक वरिष्ठांना फोनवर संपर्क साधत तब्बल अडीच तास जलाशयाच्या पाण्यात प्रकल्पग्रस्तांसह ठिय्या दिला. यावेळी प्रशासनाची कमालीची तारांबळ झाली.

जिल्हाधिकारी यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ताबडतोब पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या मोबाईल द्वारे खासदारांशी संभाषण करून दिले. मात्र जिल्हाधिकारी यांनी परिस्थिती सावरत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर सह खासदारांचे बोलणे करून देत संसदेचे या आठवड्याचे हिवाळी अधिवेशन संपताच पुढील आठवड्यात खासदार आणि प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी यांच्या समन्वयातून सभेची तारीख घेत प्रथम महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेशी सभा घेऊन सभेच्या आधारे मुख्यमंत्री स्तरावर सभा घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे कळविले.

प्रकल्पग्रस्तांना खासदारांनी विश्वासघात घेऊन जिल्हाधिकारी यांचे कडून लेखी पत्र मागवून घेतले आहे आणि त्यानंतर दगाफटका झाल्यास भंडारा जिल्ह्यात कोणत्याही मंत्र्याला फिरकू देणार नाही, असा भक्कम दमही दिला. वेळेप्रसंगी यापेक्षा हर गावात ‘उग्र जलसमाधी आंदोलन’ असा इशाराही दिला.आता पुढील भूमिका मनीषा भांडारकर, धनंजय खासदारांच्या नेतृत्वात घेऊ,असे मुलकलबार, विनोद वंजारी, स्पष्ट मनोगत भाऊ काटोरे, मंगेश पडोळे, देवराम कडुकार दिलीप मडामे, अभिषेक लेंड, आणि एजाजअली सय्यद यांनी आरजू मेश्राम, कृष्णा केवट, व्यक्त करत तूर्तास आंदोलन अतुल राधोयें, प्रमिलाताई शहारे, समाप्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *