डिजिटल अरेस्ट करून एकाची २० लाख ६१ हजाराने फसवणूक

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- अश्लिल फोटो तयार करतो तसेच मनी लेंडिंग मध्ये सहभाग असल्याचा आरोपी करून एकाला डिजीटल अरेस्ट करून त्याच्याकडून १० लाख ६१ हजार १३० रुपये वसूल केल्याची तक्रार पोलीस स्टेशन तुमसर येथे दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरिशंकर रामलगन चौबे (वय ८४) रा. शिवाजीनगर तुमसर यांच्या मोबाईलवर एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. व्हिडीओ कॉल करणाऱ्याने आपण अभिराज शुक्ला आयडी नंबर ५९७७३ टेलीकॉम रेग्युलटरी अथॉरिटी ऑफ इंडिया येथून बोलत असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या नावावर असलेले मोबाईल सीमवरून अश्लिल फोटो तयार करण्यात येत असल्याचे व नरेश गोयल मनी लाँडरींग केसमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे सांगितले. फिर्यादीला त्याने त्यांच्या आयसीआय सरकारी खात्याचे पूर्ण माहिती सांगून ते अधिकारी असल्याचा विश्वास निर्माण केला. तोंडी आदेशाने मला अकाउंट व्हेरीफाय केला.

फिर्यादीची फिक्स डिपॉझीट तोडून त्यांनी आरटीजीएस करण्यास परवानगी दिली. व्हेरीफाय झाल्यानंतर रक्कम परत होईल असे सांगितल्याने फिर्यादीने त्याच्या आयसीआयआय बँक खात्यातून फिक्स डिपॉझीट तोडून दि. १० डिसेंबर २०२५ रोजी निरज मालविया यांचे खात्यात ७ लाख ५० हजार ७२० रुपये आरजीएस केले. दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी गौरव यांच्या खात्यात आरटीजीएस केले व पैसे परत केले नाही. फिर्यादींच्या व्हिडीओ कॉलवर अभिराज शुक्ला नाव सांगून तो टेलीकॉम रेगुलटरी आथिरेटी ऑफ इंडिया येथील अधिकारी असल्याचे सांगून खोट्या न्यायालयात न्यायाधीश व इतर अधिकारी दाखवून फिर्यादीच्या आयसीआयसी बँक खात्यातील एफडी तोडून त्यांच्या दिलेल्या अकाऊंटवर आरटीजीएस करण्यास सांगून एकूण २० लाख ६९ हजार ३२० रुपयांची फसवणूक केली.

फिर्यादीला आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशन तुमसर येथे कलम ३९८(४), ३९९(२), २0४, ३(५) भा. न्या. सं. सहकलम ६६ (ब), ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय गायकवाड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *