रिदिश भवसागरने रिले स्पर्धेत पटकावले रजत पदक
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- डी. ए. व्ही. मॉईल पब्लिक स्कूल, सितासावंगी येथे नुकत्याच झालेल्या शालेय क्रिडा महोत्सवात इयत्ता ६ व्या वर्गात शिकणाऱ्या रिदिश राहुल भवसागर या विद्यार्थ्यांने शानदार कामगिरी केली आहे. रूपेरा येथील रहिवासी असलेल्या रिदिशने शाळेच्या रिले स्पर्धेमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत दुसरा क्रमांक मिळवत शाळेचे नाव उंचावले आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला रजत पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. रिदिशच्या या यशामुळे शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग तसेच त्याचे आई-वडील आणि रुपेरा गावात उत्साहाचे वातावरण आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि क्रिडा शिक्षकांनी रिदिशचे अभिनंदन केले असून, भविष्यात त्याने आणखी मोठे यश संपादन करावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.









