सडक अर्जुनी तालुक्यातील दुर्गीपार परिसरात वाघाचे दर्शन

 सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या दुर्गीपार व बकी परिसरात शनिवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास वाघ दिसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघ दिसल्याची माहिती मिळताच सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्राधिकारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव दल व विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या चमूने घटनास्थळ गाठून कोहमारा बिटे बमलेश्वरी पहाडी परिसरात गस्त घातली व ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली.

यावेळी सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्राधिकारी मिथुन तरणे, वनपरिक्षेत्राधिकारी तेजस सूर्यवंशी, वनरक्षक मुकेश चव्हाण, प्रदीप हत्तीमोरे, कोहमाराच्या सरपंच प्रतिमा भेंडारकर उपस्थित होते. परिसरात वाघ दिसल्याने वनविभागाच्या वतीने रात्रंदिवस गस्त लावण्यात आली आहे. दरम्यान, कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, वाघ दिसल्यास वनविभागाला वेळोवेळी माहिती द्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्राधिकारी मिथुन तरणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *