देवरी तालुक्यात बिबट्याची दहशत… नागरिकांमध्ये भीती.. सालाई अब्दुलटोला- चिचगड मार्गावर दर्शन..

गोदिया: गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुका नंतर आता देवरी तालुक्यातील सालाई अब्दुलटोला परिसरात बिबट्याचे मध्यरात्रीत सुमारास एका चारचाकी चालकाला दर्शन झाल्याने आणि त्यांनीच चालत्या चारचाकीतून काढलेली चित्रफिती तालुक्यात सर्वत्र प्रसारित झाल्याने परिसरातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर परिसर हा सदन जंगल आहे त्यामुळे ग्रामस्थ सतर्कतेच्या अवस्थेत आहेत.

गोंदिया जिल्हच्या देवरी तालुक्यातील सालाई अब्दुलटोला येथे बिबट्याचे दर्शन झाल्याने गावकरी नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांपासून परिसरात बिबट्याची हालचाल वाढल्याची चर्चा सुरु आहे. या घटनेनंतर सालाई अब्दुलटोला परिसरातील नागरिकामध्ये एकच खळबळ उडाली असून, रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडण्यास लोक घाबरत आहेत त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. विशेषतः या मार्गावरून नेहमी ये जा करणारे ग्रामस्थ, शाळेकरी मुले, कामानिमित्त बाहेर जाणारे महिला तसेच शेतीच्या कामासाठी जाणारे शेतकरी वर्ग विशेष चिंतेत आहेत. मध्यरात्री दिसून आलेल्या या बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाने लवकरत लवकर करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *