तीन माओवाद्यांचे शस्त्रास्त्रासह गोंदिया पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण, एरिया कमिटी कमांडरसह दोन एसीएमचा समावेश
गोंदिया: गोंदिया जिल्हा पोलिस दलास एका एरिया कमांडरसह दोन एसीएम माओवाद्यांनी स्वतःजवळील शस्त्रांसह शनिवार १३ डिसेंबर रोजी आत्मसमर्पण केले. रोशन उर्फे भराडिया वेडवा (३५, रा. मेंढरी जि. बिजापूर), सुभाष उर्फे पोप्पा बंदू रणवा (२६, देवरपल्ली जि. बिजापूर) व रतन उर्फे मनकू ओमा पोयम पोयाम (२१, रा. छेगपाल जि. नारायणपूर) असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची नावे आहेत.
राज्य शासनाने २००५ पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक तरुण माओवादी आजपर्यंत जिल्हा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. १३ नोव्हेंबर रोजी एएमसीमेंबरमधील झालो छोटे कमिटी मेंबर विकास उर्फे अनिल उर्फे नवज्योत नागपुरे उर्फे रमेश सावरा भास्कर लिंगय्या रामय्यानी शस्त्रासह १३ सह माओवाद्यांनी गोंदिया पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले होते. दरकसा एरिया कमिटीचे उर्वरित काही माओवादी सदस्य आत्मसमर्पण होणे बाकी आहे.
त्या अनुषंगाने गोंदिया पोलिस दलात उर्वरित माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, त्याचे फलित म्हणजे, १३ डिसेंबर रोजी एएमसी मेंबरमधील दरकसा एरिया कमिटी कमांडर रोशन शस्त्रासह दोन एसीएम सदस्यांनी जिल्हा पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण केले. यात राज्य शासनाने रोशनवर ८ लाख रूपये, सुभाष व रतनवर प्रत्येकी ६ लाख रूपये बक्षीस जाहीर केले होते. जिल्हा पोलिस दलासमोर रोशनने एसएलआर शस्त्र, दोन मॅगझीन व २४ राऊंडसह, सुभाषने एसएलआर शस्त्र, २ मॅगझीन व २३ राऊंडसह तर रतनने ८ एमएम शस्त्र, १ मॅगझीन व १५ राऊंडसह आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना राज्य शासनाच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत योग्य ते पुनर्वसन करण्यात येत असून नक्षल चळवळीत सक्रीय असलेल्या नक्षलवाद्यांना शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी ‘एमएमसी’ समितीचा प्रवक्ता अनंत याने प्रसिध्दी पत्रक जारी करत १ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण समितीचे आत्मसमर्पण करणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु त्यापूर्वीच १३ नोव्हेंबरला अनंतने दलाच्या १० सदस्यांसह गोंदिया पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तेव्हापासूनच या दलामध्ये उर्वरित सदस्य आत्मसमर्पण करणार असल्याचे वृत्त सुरू झाले होते. १३ नोव्हेंबर रोजी ‘एमएमसी’ समितीचा प्रवक्ता अनंत उर्फे विकास वगेरे दहा सहकाऱ्यांसह गोंदिया येथे आत्मसमर्पण केले होते. त्यामुळे नक्षलवाद्यांची ‘एमएमसी’ समितीला एकहाती फूट मोठे हानी भरले असल्याचे दिसून येत आहे.









