निम्न चुलबंद प्रकल्पातून पाण्याची उचल करण्याची परवानगी द्या

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- लवारी उमरी येथील चुलबंद नदी काठावरील शेतकऱ्यांना उन्हाळी पिकासाठी निम्न पुलबंद उपसा सिंचन योजनेच्या पाणीसाठ्यामधून पाण्याची उचल करण्यास परवानगी मिळावी या मागणीसाठी दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी लवारी येथील शेतकऱ्यांनी निम्न चुलबंद उपसा सिंचन प्रकल्प उपविभागीय अभियंता यांना निवेदन दिले. यासंदर्भात अभियंत्यांकडून सरपंच नरेश नगरीकर यांना दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी पाणी उचलन करण्यासंदर्भातपत्र प्राप्त झाले होते.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मौजा लवारी येथील नदी काठावर शेती असलेले शेतकरी नदी पात्रामधून प्रकल्प पूर्णत्वास येण्याच्या पूर्वीपासून पाण्याचा वापर करून भाजीपाला व इतर पिकांचे उत्पादन घेत आहेत. निम्न चुलबंद प्रकल्प तयार झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पात बुडीत झालेली आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची शेतजमीन पूर्णपणे प्रकल्पात बुडीत झालेली नाही. त्यामुळे शिल्लक असलेल्या जमीनीमधून पिकांचे उत्पादन करत असतात. बऱ्याचदा प्रकल्पाच्या पाण्यामुळे जमिनीतील ओलावा कायम असल्यामुळे भाजीपाला व इतर कडधान्याचे पीक घेताना त्याचा फटका पीक उत्पादनावर होतो.

विशेष म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांना पाण्याचे अन्य साधन नसल्यामुळे प्रकल्पातील पाणी शेतीकरीता उचल करण्यासंबंधाने योग्य तोडगा काढून परवाणगी देण्यात यावी. महत्वाचे म्हणजे विभागा मार्फत सन २०२५ च्या उन्हाळी पिकासाठी पाणी वापराचीडिमांड भरण्यास शेतकरी वर्गाकडून सातबारे जमा करण्यात आले होते व शेतजमीनीनुसार पाणी वापरावर डिमांड घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार ३ डिसेंबरच्या पत्रापूर्वीच नदी पात्रातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांचे धानाचे पन्हे व मका लागवड करून झालेली आहे. त्यामुळे यावर्षी सुध्दा पाणी वापरासंबंधी डिमांडची मागणी प्रती हेक्टरी ठरवून घ्यावी. शेतकरी डिमांड भरण्यास तयार आहेत मात्र पाण्याची उचल करण्यास अडथळा करू नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनाची प्रत तुम्ही आपल्याकडे आमदार नाना पटोले, तहसिलदार साकोली,मुख्याधिकारी नगरपरिषद साकोली-सेंदूरवाफा यांना देखील देण्यात आली. निवेदन देतेवेळी सरपंच नरेश नगरीकर, पं. स. सदस्य अनिल किरणापूरे, उपसरपंच, सर्व ग्रा. पं. सदस्य व अनेक शेतकरी उपस्थित होते. पाटबंधारे विभागामार्फत निम्नचुलबंद प्रकल्पाच्या कॅनलच्या पंप टेस्टिंगच्या काम सुरू असल्यामुळे पाटबंधारे विभागाकडून आर. बी. सी. च्या पंप टेस्टिंगच्या काम सुरू असल्यामुळे याकरिता पाणी लागेल तसेच शेतकऱ्यांना पाणी उपसा करण्याची परवानगी किंवा मंजुरी देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *