शिक्षकांनाच टीईटीची सक्ती का?

 दै. लोकजन वृत्तसेवा सिल्ली /अंबाडी :- दि.१२ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर विमाशिने एकदिवासीय धरणे आंदोलन पुकारले. यावेळी प्राथमिक शिक्षकांनाच टीईटीची सक्तीची का? असा सरकारला सवाल करून राज्य सरकारच्या शिक्षण विरोधी धोरणाचा समाचार घेतला. यावेळी माजी आ. व्हि. यू. डायगव्हाणे, आ. सुधाकर अडबाले, आ.ॲड. अभिजीत वंजारी, आ. विक्रम काळे, आ. जयंत आसगावकर, आ. किरण सरनाईक, अमरावती शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार दिलीप इत्यादींनी जुनी पेन्शन, शालार्थ आयडी प्रकरणे आणि टीईटीच्या निर्णयावर सरकारला खडेबोल सुनावले. सध्या शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग राबवून शिक्षणाची दैनास्था झाली आहे.

शिक्षकांच्या सरसकट जुनी पेन्शनची मागणी मागील वीस वर्षापासून प्रलंबित असतांना आता शिक्षकांना घाबरविण्यासाठी टीईटी माथी मारली. ही अन्यायाकारक बाब असून आरटीई कायद्याची अमलंबजावणी होण्यापूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना टीईटीतून सुट मिळावी. तसेच शिक्षकांना मोठया प्रमाणात अतिरिक्त करून ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याचा सरकारचा असून शाळा बंद झाल्यास गोर गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित होतील. त्यामुळे १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा निर्णय करावा. यासाठी सभागृहात वारंवार पाठपुरवा तसेच रस्त्यावरही मोठया ताकदीने लढा उभारावा लागेल. असे आ. सुधाकर अडबाले यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी भंडारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, कार्यवाह राजेश धुर्वे, पुरुषोत्तम लांजेवार, धीरज बांते, भीष्म टेम्भूर्णे, जयदेव बोकडे, चंद्रशेखर राहांगडाले, जागेश्वर मेश्राम, विजय देवगिरकर, विकास काशिवार, मनोहर कापगते, प्रकाश मते, रोहित मरस्कोल्हे, भीमराव मेश्राम, मन्साराम जिभकाटे, बेबीलाल शेंडे, विनोदकुमार मेश्राम, अनंत जायभाये, सुरेश वैरागडे, प्रभाकर मेश्राम, शालिकराम खोब्रागडे, दिनेश राठोड, महेंद्र बडवाईक, हर्षल कोट्टेवार, नरेंद्र रामटेके, धीरज मेश्राम, संजय पडोळे, प्रमोद सेलोकर, प्रमोद वंजारी, अशोक मस्के, श्रीधर खेडीकर, संजय भोवते, विपीन लाखे, तेजबहादूर यादव, मुकेश शिंगाडे, राजेश ठाकरे, खेमराज वासनिक, वंदना आगाशे, भारत राठोड, कागदराव रंगारी, केशव गाडेकर, श्रावण बावणे, योगेश मेश्राम, शैलेंद्र खोब्रागडे, दिनेश वाढई, विलास खोब्रागडे तसेच प्रांतीय पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यवाह, तालुका पदाधिकारी, सदस्य व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *