माडगी भगवान नृसिंह पावनधामवर यात्रेचा शुभारंभ

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मोहाडी-तुमसर तालुक्याच्या सिमेवर गोंदिया राज्यमार्गावरील वैनगंगेच्या पवित्र पात्रात वसलेल्या प्रभू नृसिंहांच्या पावनधाम तिर्थक्षेत्र माडगी येथे यात्रेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात हे तिर्थक्षेत्र मीनी पंढरी व विदर्भाची काशी म्हणूनही ओळखले जाते. यात्रेला विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातील हजारो भाविकांची उपस्थिती लाभत आहे. १८ ते २२ डिसेंबर दरम्यान राजयोगी अण्णाजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सव सोहळ्याने यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे. कार्तिक पौर्णिमेनंतर अमावस्यापासून दरवर्षी १५ दिवसाची मोठी यात्रा नदीच्या खुल्या पात्रात भरत असते.

यात्रेला प्रारंभ झाल्याने भक्तांचा लोंढा माडगी व देव्हाडाकडे वळत आहे. हजारो भाविकांनी या तिर्थक्षेत्रात गर्दी केली असून अनेकांनी वैनगंगेचे निर्मळ पाण्याने स्नान केले आहे. तुमसर-गोंदिया मार्गाव्रील माडगी येथे वैनगंगेच्या कुशीत मोठ्या दगडाच्या टेकडीवर पांढरेशुभ्र नृसिंहाचे मंदिर आहे. या ऐतिहासिक मंदिरात दोन मुर्ती आहेत. एक रौद्र रूप तर दुसरी साधी भोती प्रतिकृतीची आहे. येथील मंदिराविषयी एक अख्यायिका पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. भगवान विष्णू नृसिंह अवतरात खांबातून प्रकट झाले व हिरण्यकश्यपाच्या पोटात आपली तीक्ष्ण नखे खुपसून, आपल्या मांडवी मांडून वध केला. हे नृसिंहाचे रूप उग्र स्वरूपाच्या मुर्तीतून प्रतिबिंबीत होते. जवळच्या दरवाज्यातून सरळ आत गेल्यास तळघरासारखा भास होतो. तेथे हनुमंताची मूर्ती आहे. त्याच कोपऱ्यात हवनकुंउ आहे.

काही पायऱ्या चढल्यास दरवाज्यावर उभे असता कृष्ण भगवानाची पाच फुट उंच विशाल मूर्ती दिसले. मुर्तीजवळ खिडकीतून भगवंताच्या मुर्तीवर सूर्य प्रकाशपडून मूर्ती विलोभनीय दिसले. हा मंदिराचा सर्वात उंच भाग आहे. सदगुरु योगीराज स्वामी, सितारामदास महाराजाच्या आदेशावरून राजयोगी अण्णाजी महारात नृसिंग माडगीला सन १९२८ साली आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांशी त्यांची जवळीक होती. ते माडगी येथील नृसिंग टेकडीवर सन १९२८ साली आले होते. त्यांनी माडगी येथील नृसिंग टेकडीवरील तपश्चर्या उपासना, योगाभ्यास साधना, ध्यान साधना, प्रवचन तसेच अनेक शास्त्रांचा अभ्यास केला. पुराणातील दाखले देवून भाविक भक्तांना शंकेचे निराकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *