तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा सेंदूरवाफा येथे बक्षिस वितरणाने समारोप
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- शिक्षण विभाग पंचायत समिती साकोलीच्या वतीने लक्ष्मीनारायण हायस्कूल सेंदूरवाफा (साकोली) येथे दि. ८ ते ९ डिसेंबर २०२५ असे दोन दिवस चाललेल्या २०२५-२६ या सत्रातील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा बक्षिस वितरणाने थाटात समारोप झाला. प्रदर्शनीचे उदघाटन दि.८ डिसेंबर रोजी बालविकास प्रकल्प अधिकारी योगीता परसमोडे यांचे हस्ते पार पडले.
अध्यक्षस्थानी जगत मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या संचालिका डॉ. रूपाली रहांगडाले तर विशेष अतिथी म्हणून प्रमोद सेलोकर, वैशाली लेंडे, ईश्वर चव्हाण, गटशिक्षणाधिकारी विजय आदमने, मुख्याध्यापिका स्मिता कटरे, केंद्रप्रमुख अ.ब मेश्राम, एस. आर. हटवार, प्राचार्य आर. एस. लंजे, व्ही. ए. लांजेवार, रामकृष्ण बोरकर, प्रा. डॉ. खुशाल बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनीत प्राथमिक विद्यार्थी गटात ६७, माध्यमिक ३७, प्राथमिक शिक्षक गटात ५, माध्यमिक २, दिव्यांग विद्यार्थी गट १, उल्लास मेळावा ४ असे १११ प्रयोग समाविष्ट होते.
प्राथमिक गटात प्रथम क्रमांक धीरज बोरकर ब्लॉसम इंग्लिश स्कूल सेंदूरवाफा, द्वितीय लकी बावणे जि. प. शाळा सुकळी तर तृतीय क्रमांक खेमंत सोनवाने परेश हायस्कूल किन्ही, माध्यमिक गट प्रथम क्रमांक मनिष गहाणे सर्वांगीण शिक्षण हायस्कूल पिंडकेपार, द्वितीय भावेश रोकडे जि. प. हायस्कूल सानगडी तर तृतीय क्रमांक चिन्मय हटवार लक्ष्मीनारायण हायस्कूल सेंदूरवाफा यांनी पटकावला. प्राथमिक शिक्षक गट प्रथम क्रमांक भाऊदास मेश्राम जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा विहिरगाव, माध्यमिक केतन पी. हत्तीमारे अँकेडमिक हाईटस पब्लिक स्कुल साकोली, दिव्यांग विद्यार्थी गट यशस्विनी संदीप निनावे जि. प. हायस्कूल सानगडी, उल्लास मेळावा रजनी बिसेन यांनी क्रमांक पटकावले.
यावेळी मुख्य बक्षिस वितरक म्हणून जि. प. प्राथमिक उपशिक्षणाधिकारी राहुल बावा तर अध्यक्षस्थानी संस्था सहसचिव विमल रहांगडाले होत्या. विशेष अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी विजय आदमने, मुख्या. स्मिता कटरे, आर. एस लंजे, एस. आर. हटवार, बीआरसीचे कोडापे, शेंडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भारती ठाकूर यांनी तर आभार जी.पी. बोरकर यांनी केले. यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी विजय आदमने, मुख्याध्यापिका स्मिता कटरे, केंद्र प्रमुख तथा सर्व कर्मचारी शिक्षण विभाग समग्र शिक्षा अभियान पं. स. साकोली व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी लक्ष्मीनारायण हायस्कूल सेंदूरवाफा यांनी सहकार्य केले.









