शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांची जिल्हा परिषद भंडारा योजना कार्यालयास सदिच्छा भेट
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- कृष्णकुमार पाटील, शिक्षण संचालक (योजना) यांनी दि. १० डिसेंबर २०२५ रोजी शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, भंडारा कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी योजना विभागाच्या विविध योजना/ उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच योजना विभागांतर्गत वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत माहे – मार्च २०२६ नवसाक्षरांची ऋङछअढ परीक्षा घेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने असाक्षर, स्वयंसेवक नोंदणी, टॅगिंग, प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करावी.
नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यवेक्षिय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम सुचवावे. तालुकास्तरावर तसेच जिल्हास्तरावर उल्लास साक्षरता मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. राज्यस्तरीय उल्लास मेळाव्याच्या अनुषंगाने आवश्यक पूर्वतयारी करण्यात यावी, असे निर्देश मा. शिक्षण संचालक महोदयांनी दिले. यावेळी रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी (योजना/ प्राथमिक), मनिषा गजभिये, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), मंगला गोतारणे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), रमाकांत झाल्टे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), रविंद्र माडेमवार, शिक्षण विस्तार अधिकारी, नितीन वाघमारे, सहाय्यक योजना अधिकारी, शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालय, जिल्हा परिषद, नागपूर यांची उपस्थिती होती.









