सागवन तस्करी करणारा ट्रक वनविभागाच्या जाळ्यात

 दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा ः- मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात शिरकाव करून नागपूरकडे सागवान भरून जाणारा १० चक्का ट्रक वनविभागाच्या जाळ्यात अडकला असून ट्रक सह १२ लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. मध्यप्रदेशातून सागवान भरून येणारा ट्रक क्र. युपी९४ / टी – ६६१४ हा ट्रक नागपूरकडे जात असतांना तुमसर – बपेरा राज्य मार्गावर रनेरा गावच्या सीमेत उभा होता.ट्रक मध्ये सागवान भरून असल्याची माहिती वनविभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले व चौकशीची चक्रे फिरविलीअसता ट्रकचा इंजिन खराब झाल्यामुळे थांबला असल्याचे सांगण्यात आले.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे त्यांनी सागवान भरलेला तो ट्रक जवळच असलेल्या वनपरिक्षेत्र कार्यालय हरदोली येथे जमा करण्याची सूचना दिली.दरम्यान ट्रकचे कागदपत्र व सागवानच्या टीपीची पडताळणी केली असता संशय व्यक्त करण्यात आला आणि वनपरिक्षेत्र कार्यालय हरदोली येथे ट्रक खाली करण्याचा आदेश देण्यात आला असता सागवानच्या लाकडावर हॅमरिंग नसल्याचे लक्षात आले. सागवानची पूर्ण लाकडे व ट्रक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे. ट्रक आणि सागवानची लाकडे चिचोली डेपोमध्ये हलविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *