तुमसर तालुक्यात विज्ञानाची मेजवानी

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- पंचायत समिती शिक्षण विभाग, तुमसर यांच्या वतीने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ हे फादर एग्नल स्कूल तुडका येथे ८ व ९ डिसेंबर रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. प्रतिभावान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण मॉडेल्स, वैज्ञानिक कल्पना आणि प्रयोगांनी संपूर्ण प्रदर्शन परिसर ज्ञान, जिज्ञासा आणि कल्पकतेने उजळून निघाला. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संदीपजी टाले, माजी सभापती (बांधकाम), जि. प. भंडारा यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षस्थानी दिलीपजी सार्वे, सदस्य जि. प. भंडारा हे होते. विशेष अतिथी म्हणून दीपिकाताई गोपाले सभापती पं. स. तुमसर, सुभाषजी बोरकर उपसभापती पं. स. तुमसर, रमेशजी पारधी सदस्यजि. प. भंडारा हे प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पल्लवीताई कटरे, आम्रपालीताई पटले, मीनाक्षीताई शहारे, सुशील पटले तसेच सर्व केंद्रप्रमुख आणि विशेष शिक्षक प्रकाशजी साठवणे (सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी) उपस्थित होते. प्रास्ताविक अर्चना माटे गटशिक्षणाधिकारी, पं. स. तुमसर यांनी केले.

संचालन ज्योती निंबार्ते, सहाय्यक शिक्षिका जिजामाता प्राथमिक शाळा यांनी केले. आभार प्रदर्शन टेकलाल आर. पुष्पतोडे, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी मानले. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थी, तसेच शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक गटांनी विविध वैज्ञानिक विषयांवरील मॉडेल्स सादर करून पाहुण्यांची, परीक्षकांची आणि उपस्थितांची वाहवा मिळवली. यात सहभागी झालेल्या शाळांचे निकाल जाहीर करण्यात आले.

त्यात उच्च प्राथमिक विद्यार्थी गट प्रथम संस्कार बारई- जनता विद्यालय तुमसर, द्वितीय रिहांश जितेंद्र गौतम – फादर एग्नेल स्कूल तुडका, तृतीय सुजल प्रमोद डोंगरे – इंदुताई विद्यालय तुमसर यांनी पटकाविले. माध्यमिक विद्यार्थी गट प्रथम वेदिका किशोर रेहपाडे – जनता विद्यालय तुमसर, द्वितीय खांदिनी मोरे – आर. एस. जी. के. विद्यालय तुमसर, तृतीय मयूर गौपाले- गुरुदेव हायस्कूल आष्टी, प्राथमिक शिक्षक गट प्रथम प्रीती गोवर्धनदास अग्रवाल – जि. प. पूर्व माध्यमिक शाळासिंदपुरी, माध्यमिक शिक्षक गट प्रथम कुमारी दीपिका गणपतराव टिळे – जि. प. हायस्कूल नाकाडोंगरी, प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर गट प्रथम संतोष गंगाधर भेलावे – जि. प. हायस्कूल चुल्हाड यांना प्राप्त झाले. दि. ९ डिसेंबर रोजी आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य राहुल डोंगरे, मुख्याध्यापक शारदा विद्यालय तुमसर होते.

यावेळी गटशिक्षणाधिकारी अर्चना माटे, प्रकाश मीज मुख्याध्यापक फादर एग्नल स्कूल तुडका, परीक्षक अरविंद साठवणे, एम. एस. कुठे, पी. व्ही. जांभुळकर उपस्थित होते. अध्यक्षीय समारोपात प्रसिध्द वक्ते तथा मुख्याध्यापक राहुलजी डोंगरे म्हणाले, “तुमच्यातील प्रतिभा पाहून ठाम विश्वास वाटतो की, या विज्ञान प्रदर्शनातून उद्याचे वैज्ञानिक, अभियंते आणि संशोधक घडतील. यशासाठी नव्हे, तर समाज आणि देशासाठी संशोधन करा. प्रत्येक मॉडेल हे राष्ट्राचे उद्याचे स्वप्न आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणे ही काळाची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *