बारूदगोळा व रानडुकराच्या मांसासह चार शिकाऱ्यांना अटक

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- येथील पोलीस ठाणे हद्दीतील अड्याळ वनपरिक्षेत्र कार्यालय व क्षेत्र सहाय्यक कार्यालय किटाडी अधिनस्त लाखनी तालुक्यातील किटाडी जंगलबिटात बारूदगोळ्याच्या सहाय्याने रानडुक्कराची शिकार करून त्यांचे मांस विक्रीसाठी नेण्याची तयारी करीत असताना रानडुकराच्या ७० किलो मांसासह चार शिकाऱ्यांना वन विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून अटक केली.

ही कारवाई मंगळवारी (९ डिसेंबर) सकाळी १० वाजताच्या सुमारास करण्यात आली. धर्मेंद्रसिंग गोविंदासी टाक (५२ वर्ष), जालिंदरसिंग नेपालसिंग टाक (४० वर्ष), बलदेवसिंग धर्मेंद्रसिंग टाक (२३ वर्ष), लक्ष सतीश अहिरवार(१६ वर्ष), सर्व रा. अजर्ुनी (मोरगाव), जि. गोंदिया अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. किटाडी जंगल बीटात मंगळवारी वन विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मांसभक्षी जनावरांचे पदचिन्ह सर्वेक्षणाचे काम करीत असताना चार संशयित इसमआढळून आले. त्यांची कसून चौकशी केली असता बारूदगोळ्याच्या साहाय्यानेरानडुकरांची शिकार केल्याचे सांगितले. त्यांच्याजवळून ७० किलो रानडुकराच्या मांसासह शिकारीसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड, दोन मोटरसायकल, एक काता, दोन सुरी जप्त केल्या. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही कारवाई लाखनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर शिंपले, वनरक्षक गोपीचंद डोये, बीटरक्षक अमित वाघाये, वनपाल राहुल लोणारे, नागेश सिंगारपुतळे, चंद्रकांत मोरे, राजेश माटे यांच्यासह वन मजुरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *