“नया भारत, मेरा भारत’ संकल्पनेवर आधारित स्प्रिंगडेल शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- सन्नीज स्प्रिंगडेल शाळेत “नया भारत, मेरा भारत’ या शीर्षकाखाली दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्कृत भारतीचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख शिरीष देवपुजारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या फोटोला माल्यार्पण करीत स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आला. पाहुण्याचा परिचय करून देत, विद्यार्थ्यांनी सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील रहावे असे मेंढे यांनी सांगितले. यावेळी शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धांचे विजेते व गुणवंत तसेच सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषकांचे वितरण करण्यात आले.

शाळेच्या समन्वयिका नीता भोयर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. अध्यक्षीय भाषणात पाहुण्यांनी भारताचे ध्येय, ज्ञानाचा उपयोग करुन प्रगतीपथावर जावे, समाजाच्या हितासाठी वसुधैव कुटुंबकम् चा अवलंब करावा असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान व समाजशास्त्र विषयाबद्दल जिज्ञासू वृत्ती जागरूक करण्याकरिता विज्ञान व रोबोटिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन संजय आयलवार, रमेश तईकर, अमोल पदवाड यांचे हस्ते झाले. या प्रदर्शनात अनेक वैज्ञानिक प्रतिकृती समाविष्ट करण्यात आल्या होत्या.

“नया भारत, मेरा भारत’ या संकल्पने वर आधारित विद्यार्थ्यांनी आपल्या देशाची परंपरा जपत आधुनिक संसाधनांचा वापर करत नृत्ये, नाटीका, हास्य कविता सादर केल्या. विविध वाद्यांच्या सहाय्याने सांगितिक कार्यक्रम तसेच एकत्र कुटुंबाचे महत्त्व दर्शवणारी लघुनाटिका सादर केली गेली. यात नर्सरी ते नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. महाराष्ट्राच्या परंपरेचे जतन करणाऱ्या किल्ल्यांची देखील प्रतिकृती सकरण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशेष म्हणजे संपूर्ण सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनी अतिशय लयबद्ध रीतीने केले.

यावेळी मंचावर सत्यम् एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा माजी खासदार सुनिल मेंढे, कोषाध्यक्षा शुभांगी मेंढे, संचालक अनंत आष्टीकर, डॉ. सौ. कांचन आष्टीकर, श्री. अजित आष्टीकर, अनघा आष्टीकर, विनय अंबुलकर, सुरभी अंबुलकर, शाळेच्या शैक्षणिक संचालक अनघा पदवाड, शैक्षणिक सल्लागार अमोल पदवाड, शाळेच्या प्राचार्या शेफाली पाल, प्रायमरी प्रमुख समृद्धी गंगाखेडकर, के. जी. प्रमुख कल्पना जांगडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शाळेतील शिक्षक वृंद व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *