तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू

नागपूर:- तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध लक्षवेधी आणण्यावरुन राजकीय वातावरण तापलं असून भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी ९ डिसेंबर रोजी विधानसभा सभागृहात तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून आपणास बघून घेऊ, अशी धमकी आल्याचं म्हटलं. तसेच, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी चुकीच्या पद्धतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा अतिरिक्त पदभार आपल्याकडे ठेऊन घेतला होता, यासंदर्भात आपण लक्षवेधी दिली असून त्यामध्ये सविस्तरपणे लिहिण्यात आल्याचं सांगितलं. तसेच, त्यांच्यावरील लक्षवेधीमुळे आपणास दोन जणांनी फोन करुन धमकी दिली. नागपूर अधिवेशनासाठी आलो असता, मला धमकीचे फोन आल्याचंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, ९ डिसेंबर रोजी सभागृहात तुकाराम मुंढेंविरुद्ध आमदार कृष्णा खोपडे आणि आमदार प्रवीण दटके यांनीही तक्रार केली. तर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तुकाराम मुंढेंची बाजू घेतली. आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभेत तुकाराम मुंढेंच्या लक्षवेधीचा मुद्दा ९ डिसेंबर रोजी उपस्थित केला. तसेच, आपणासत्यांच्या समर्थकांकडून धमकीचे फोन आल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच, आमदार प्रवीण दटके यांनीही सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्याविरोधात सभागृहात भूमिका घेतली.

२० ऑक्टोबर २०२५, धनंजय भागवत कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी हे पत्र लिहिलं आहे, त्यामध्ये नागपूर स्मार्ट सिटी संदर्भातील नियुक्तीवरुन कारवाई करण्याचे पत्र असल्याचं दटके यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, तुकाराम मुंडेंनी डिलिव्हरी नंतर ५ दिवसांच्या प्रसुत महिलेची सुट्टी रद्द केली, दुसऱ्या एका महिलेनं तक्रार केली आहे, तुकाराम मुंडेंनी म्हटलं त्या नस्तीवर सही नाही केली म्हणून त्यांना विचित्र शब्दाचा प्रयोग झाला, त्याची महिला आयोगाकडे तक्रार झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *