दुसऱ्या दिवशी भंडारा व वर्धा यांचे वर्चस्व, आज ॲथलेटिक्सचा थरार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :-पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०१५’ मध्ये खेळाडूंचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

स्पर्धेचा दुसरा दिवस (दि. ०६ डिसेंबर) अत्यंत चुरशीचा ठरला, जिथे रात्रीच्या सत्रात हँन्डबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि कबड्डी या खेळांचे सामने विद्युत झोतात खेळवण्यात आले. या सत्रात यजमान भंडारा पोलीस दलासह, वर्धा आणि गडचिरोलीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. विशेषतः बास्केटबॉल महिला व पुरुष गटात आणि हँन्डबॉलमध्ये भंडारा संघाने आपली पकड मजबूत केली.

आज स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी (रविवार, दि. ०७ डिसेंबर) सकाळच्या सत्राची सुरूवात चैतन्य ग्राऊंडवर मैदानी स्पर्धांनी झाली. पहाटेपासूनच १५०० मीटर, ८०० मीटर, १०० मीटर धावणे, भाला फेक आणि हर्डल्स शर्यतींमध्ये खेळाडूंनी आपले कसब पणाला लावले. याच वेळी ड्रील शेडमध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धा व वजन तपासणी पार पडली. सकाळच्या सत्रात झालेल्या सांघिक खो-खो सामन्यांमध्ये खेळांमध्ये हॉकीचा सामना गडचिरोली आणि भंडारा संघांनी बरोबरींत सुटला, तर महिलांच्या विजय मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *