मचारना येथे शंकरपटाच्या दाणीवर जुगाऱ्याला अटक!

दै. लोकजन वृत्तसेवा-पालांदूर :– प्लास्टिक डब्याच्या आधाराने प्लास्टिक बॅनरवर १ ते ६ आकडे लिहिलेले व लाकडी चौकोनी गोटीच्या आधाराने पैशाचा जुगार खेळताना पोलिसांनी पकडले. ही घटना लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत मचारना येथे शंकरपटाच्या दाणीवर गुरुवारला (४ डिसेंबर) सायंकाळी ६:४५ वाजे दरम्यान घडली. कृष्णकुमार दीनदयाळ खंडेलकर गोरेगाव जिल्हा गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेले मुद्देमाल- प्लास्टिक बॅनर किंमत पन्नास रुपये, प्लास्टिकच्या लोटा किंमत वीस रुपये, लाकडी चौकोनी गोटी किंमत पाच रुपये, फळावर नगद ७२०, अंगझडतीतील ७०० असा एकूण १४९५ चा मुद्देमाल पंचा समक्ष जमा करण्यात आला. मचारना येथे गुरुवारी बैलांचा पट सुरु होता. पालांदूर पोलिसांनी पटाच्या दाणीवर हजेरी लावली. यावेळी पटाच्या दाणीचे बाजूला एक इसम हा प्लास्टिक बॅनरवर लोकांकडून पैसे घेऊन हारजितचा जुगार खेळवत दिसल्याने पोलीस स्टाफसह रेड केली असता इतर हजर असलेले इसम घटनास्थळावरून प्रसार झाले. हाती लागलेल्या इसमावर गुन्हाची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार भालेराव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *