६२० उमेदवारांचे नशीब ईव्हीएममध्ये बंद, सरासरी मतदान ६५ टक्के

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली या नगरपालिकांसाठी आज दि. २ डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले. सोबतच ३४ नगराध्यक्ष व ५८८ नगरसेवक पदांच्या उमेदवारांचे भाग्य २१ डिसेंबरपर्यंत ईव्हीएममध्ये बंद झाले आहेत.

न्यायालयाच्या निर्णयानंतर ३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी आता २१ डिसेंबर रोजी होणार आहे. चारही निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी ३४ उमेदवार तर ९८ नगरसेवक पदासाठी ५८८ उमेदवार रिंर्गणात होते. यामध्ये भंडारा येथे १९९, तुमसर-१६०, पवनी-१२२ तर साकोली-सेंदुरवाफा-१०७ उमेदवार आहेत.

भंडारा शहरातील १०३, तुमसर-५०, पवनी-२८ व साकोली सेंदुरवाफा येथील ३० मतदान केंद्रावर ही निवडणूक पार पडली. चारही नगरपालिकेसाठी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान मतदानासाठी मतदार मतदान केंद्रावर गेल्याने मतदानाची वेळी ५.३० वाजता संपल्यानंतरही अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अंतिम टक्केवारी यायला विलंब झाला. सकाळी ७.३० ते ११.३०दरम्यान भंडारा नगरपालिकेसाठी १४.७० टक्के, तुमसर-१६.२७, पवनी-२०.२२ व साकोली सेंदुरवाफा-१७.९० असे एकूण १६.२१ टक्के मतदान झाले होते.

दुपारी १.३० पर्यंत भंडारा नगरपालिकेसाठी २७.१९, तुमसर-३०.३७ पवनी-३५.८२ व साकोली सेंदुरवाफासाठी ३३.१५ असे एकूण २९.८५ टक्के मतदान झाले होते. दुपारी ३.३० पर्यंत भंडारा नगरपालिकेसाठी ४१.९९, तुमसर-४७.७०, पवनी-५४.२२ व साकोली सेंदुरवाफासाठी ५२.१४ असे एकूण ४६.२८ टक्के मतदान झाले होते. भंडारा नगरपरिषदेसाठी पोलीस बहु. सभागृह, तुमसरतहसील कार्यालय, पवनीनगरपालिका विद्यालय व साकोली- तहसील कार्यालय येथील स्ट्रॉगरुमध्ये ईव्हीएम शिलबंद करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *