निवडणूक काळात अवैध दारू तस्कर अटकेत

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन साकोलीने अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत १,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १० वाजता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिवाजी वार्ड, साकोली येथील अमित चुनीलाल बोरकर (वय ३२) हा अवैधरित्या दारू वाहतूक करत असल्याची खात्री पटताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून प्रत्येकी ९० ाश्र क्षमतेच्या ९०० देशी दारूच्या बॉटली तसेच वाहतुकीसाठी वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली शिवम विसापूरे यांच्या देखरेखीखाली साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, सहायक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर तसेच पोलीस कर्मचारी नरेंद्र झलके, मधुकर शेंडे आणि चंद्रहास थेर यांच्या पथकाने केली. निवडणूक काळात अवैध दारूची वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या या तत्पर कारवाईमुळे गैरकृत्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *