वर्षा लांजेवारची अपील आयुक्तालयाने फेटाळली

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- तालुक्यातील शंकरपुर/वडेगांव येथील नऊ महिन्यांच्या दीर्घ काळानंतर, मिनी अंगणवाडी केंद्र – शंकरपुर येथील अंगणवाडी मदतनीस पदभरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी २२ सप्टें. रोजी वडेगांव येथील उमेदवार वर्षा लांजेवार यांची अपील अमान्य करून जि. पं. भंडाऱ्याचे जिल्हा कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांचे आदेश कायम केले आहे. बाल विकास प्रकल्प साकोली येथील अधिकाऱ्यांनी शंकरपुर येथील प्रकल्प वडेगांव महसूलीदृष्ट्या येत असल्याने वडेगांव येथील स्थानिकेची नियुक्ती केली होती.

मात्र; शंकरपुर येथील स्थानिकांना हे निकाल अमान्य असल्याने, जिल्हा कार्यकारी अधिकाऱ्यांनी २४ जुलै रोजी सुनावणी घेऊन ३० जुलै रोजी पत्र प्रकाशित करत भरती प्रक्रियायोग्यरित्या न राबविल्याने नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. मात्र; ४ ऑगस्ट रोजी, जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांचे आदेश अमान्य असल्याने, वर्षा लांजेवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे धाव घेऊन द्वितीय सुनावणीची याचिका दाखल केली होती. त्यावर ११ सप्टें. रोजी विजयलक्ष्मी बिदरी यांनी आपल्या दालनात अपीलार्थी वर्षा लांजेवार व गैरअपिलार्थी मिलिंदकुमार साळवे, शेजल सयाम व वैशाली सयाम यांना बोलावून सुनावणी घेतली होती.

१७ सप्टें. रोजी शेजल सयाम यांनी शंकरपुर ग्रामवासीयांचेसामूहिक अर्ज दाखल केले होते. त्यावर २२ सप्टें. रोजी विजयलक्ष्मी बिदरी यांनी आदेश पत्र प्रकाशित करून टपाल विभागाने पत्र पुढे पाठविले. ०८ ऑक्टों. रोजी अपिलार्थी व गैरअपिलार्थी यांना आदेश पत्र प्राप्त झाले असून, जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांचे आदेश कायम करण्यात आले आहे तर वर्षा लांजेवार यांची अपील अमान्य करण्यात आली आहे. तर पुनः एकदा शंकरपुर ग्रामस्थ भरती प्रक्रियेच्या प्रतिक्षेत लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *