आमदार सुनील शिंदेंचं नाव ७ वेळा, श्रद्धा जाधवांचं नाव ८ वेळा, निवडणूक आयोगाची सर्कस झाली आहे का? आदित्य ठाकरेंचा मतदार यादीवरुन संतप्त सवाल
मुंबईः- २० नोव्हेंबरला मुंबई महापालिकेची जी प्रारूप मतदार यादी आली, त्यानंतर मोठा गोंधळ समोर आलाय. मुंबईमध्ये २२७ वॉर्ड आहेत. ३ ते ४ हजार ऑबजेक्शन आम्ही घेतले आहेत. आमचे आमदार सुनील गोविंद शिंदे यांचे यादीत ७ वेळा नाव आले आहे. त्यांचे वय, फोटो वेगळे आहेत. पण नाव सात वेळा आहे. तर श्रद्धा जाधव यांचे नाव ८ वेळा आले आहे. निवडणूक आयोग तुम्ही सर्कस करत आहात का? असा सवाल उपस्थित करत ठाकरेंच्या सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केलाय.
आदित्य ठाकरे म्हणाले की, २० नोव्हेंबरला मुंबई महापालिकेची जी प्रारूप मतदार यादी आली, त्यानंतर मोठा गोंधळ समोर आला. निवडणूक आयोगाची आम्ही भेट घेतली, आम्ही पत्र दिलं. आणखी काही दिवस मागून घेतले. आम्ही स्वतः यादीवर काम करत आहोत. शाखे-शाखेत जाऊन आम्ही करत आहोत. आपण बघतोय बॅग घेऊन येताय. त्यातपैसे आहेत की नाही हे माहिती नाही. कोणी धमक्या देताय. मुंबईमध्ये २२७ वॉर्ड आहेत. ३ ते ४ हजार ऑबजेक्शन आम्ही घेतले आहेत.









