आज होणार ४ नगराध्यक्ष व ९८ नगरसेवकांसाठी मतदान

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- अखेर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार तोफा आज रात्री १०.०० वाजता थांबल्यात. दि. ०२ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी, साकोली-सेदुरवाफा या चार नगरपालिकेचे ४ नगराध्यक्ष ९८ नगरसेवकांसाठी २११ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

चारही नगरपालिकेत ८८०१५ स्त्री मतदार, ८२२९७ पुरुष मतदार व ३ इतर असे एकूण १ लाख ७० हजार ३१५ मतदार मतदान करणार आहेत. जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. चारही नगरपालिकेत १०० नगरसेवक आहेत. मात्र भंडारा येथे दोन नगरसेवकांची निवडणुकी लांबणीवर पडल्याने ९८ नगरसेवकांसाठी मतदान होणार आहे.

भंडारा नगरपालिकेतनगराध्यक्ष पदासाठी ११ उमेदवार रिंर्गणात आहेत. तर १७ प्रभागात ३५ नगरसेवकांसाठी २३७उमेदवार रिंर्गणात होते. आता ३३ नगरसेवकांसाठी २२९ उमेदवार रिंर्गणात आहेत. येथे १०३ मतदान केंद्रावर निवडणुक होणार आहे. ४४२६१ स्त्री मतदार, ४१३४४ पुरुष मतदार व इतर ३ असे एकूण ८५ हजार ६०८ मतदार मतदार आहेत. तुमसर नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार रिंर्गणात आहेत. तर २५ नगरसेवकांसाठी २०३ उमेदवार रिंर्गणात होते. येथे ५० मतदान केंद्रावर निवडणुक होणार आहे. २०५४८ स्त्री मतदार, १९२०८ पुरुष मतदार असे एकूण ३९ हजार ७५६ मतदार मतदार आहेत. साकोली-सेंदुरवाफा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवार रिंर्गणात आहेत. तर २० नगरसेवकांसाठी १०७ उमेदवार रिंर्गणात होते. येथे ३० मतदान केंद्रावर निवडणुक होणार आहे.

११६४१ स्त्री मतदार, ११०४० पुरुष मतदार असे एकूण २२ हजार ६८१ मतदार मतदारआहेत. पवनी नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार रिंर्गणात आहेत. आता २० नगरसेवकांसाठी १२२ उमेदवार रिंर्गणात आहेत. येथे २८ मतदान केंद्रावर निवडणुक होणार आहे. ११५६५ स्त्री मतदार, १०७०५ पुरुष मतदार असे एकूण २२२५६ हजार ६०८ मतदार मतदार आहेत. भंडारा नगरपरिषदेसाठी पोलीस बहु. सभागृह भंडारा, तुमसरसाठी तहसील कार्यालय तुमसर, पवनीसाठी नगरपालिका विद्यालय पवनी व साकोलीसेंदूरवाफा साठी तहसील कार्यालय पवनी येथे स्ट्राँग रूम असून तेथे मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम ठेवण्यात येणार आहेत. तेथेच मतमोजणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *