भंडारा जिल्हा भाजपा बनली ‘प्रायव्हेट लि. कंपनी’; भाजपाचा राजीनामा देणा-या पदाधिकाऱ्यांना आरोप

oplus_2

भंडारा :- पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या जुने आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट वाटपात हेतुपुरस्पर डावलण्यात आले. पैसे घेवून उमेदवारी देण्यात आली. भारतीय जनता पार्टी ही पूर्वीची पार्टी राहिली नसून आता ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ बनली असल्याचा आरोप भाजपाचा राजीनामा दिलेल्या असंतुष्ट गटाने आज हॉटेल साई प्लाझा मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

पत्रपरिषदेत भाजपाचा राजीनामा दिलेले रोशन काटेखाये, विकास मदनकर, अनुप ढोके, रोशन काटेखाये, सौ. वनिता कुथे, सौ. साधना त्रिवेदी, सौ. माला बगमारे, सौ. मंजिरी पनवेलकर यांच्यासह २० लोक उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी त्यांच्यावर भाजपामध्ये कसा अन्याय करण्यात आला, हे सांगितले. पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या जुने व निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट वाटपात हेतुपरस्पर डावलण्यात आले. नव्याने पक्षात आलेल्या, भाजपाच्या विचारधारेपासून दूर असलेल्या लोकांना तिकीट दिल्याने पक्षात असंतोष वाढला आणि अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. तिकीटे देतांना पैसे मागण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात काही लोकांचे नाव स्पष्ट करून त्यांनी कोणता घोटाळा केला, ते सुद्धा नमूद केले. आमच्यावर भोंडेकरांकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे, हा आरोप पूर्णतः चुकीचा असल्याचेही ते म्हणाले. निष्ठावान आणि विद्यमान नगरसेवक/नगरसेविकांना डावलून ज्यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आणि माफियागिरीचे आरोप आहेत. अशा वादग्रस्त लोकांना उमेदवारी देण्यात आली.

भंडारा शहरातील तसेच जिल्ह्यातील मतदारांनी व भाजपच्या निष्ठावान कार्यकत्यांनी या निवडणुकीत भाजपला पराभूत करून भाजपातील एकाधिकारशाहीला धडा शिकवावे, असेही आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *