तुमसरात इंजि. अभिषेक कारेमोरे यांचा भव्य रोड शो!
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर सोमवारी तुमसर शहरात अभूतपूर्व उत्साह आणि गर्दी पहावयास मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनीयर अभिषेक कारेमोरे यांच्या भव्य रोड शो ने संपूर्ण शहर अक्षरशः दणाणून गेले.
निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने सकाळपासूनच शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले होते. या रोड शो मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १२ प्रभागातील उमेदवार आपल्या समर्थकांसोबत उपस्थित होते.









