राज्यातील २० नगरपालिकांमध्ये निवडणुका कार्यकर्त्याचा हिरमोड; पुणे, धाराशिव, पुढे ढकलल्या, प्रभागात सोलापूर, चंद्रपूरचा समावेश

 मुंबई:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला असून २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतांच्या निवडणुका संपन्न होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना आता काही जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांना, काही प्रभागातील निवडणुकांना ब्रेक लागला आहे. राज्यातील साधारण २० जिल्ह्यातील काही नगरपालिकांच्या प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामध्ये, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे.

दरम्यान, राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होत असून ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकांच्या प्रचारतोफा अंतिम टप्प्यात आल्या असताच काही नगरपालिकांतील विविध प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगरपालिका आणि नगरसेवकपदाची निवडणूक लांबणीवर पडली असून आता २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठीचा, सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. यापूर्वी न्यायालयीन प्रक्रियेत मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक अडकली होती. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांबाबत असणाऱ्या न्यायालयीन केसेसचे आदेश २७ नोव्हेंबरला आल्याने मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीला निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली होती. आता मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *