चुल्हरडोह येथे वाघाच्या हल्ल्यात गाय गोरी ठार

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पोलीस स्टेशन सिहोराच्या हद्दीत असलेल्या चुल्हरडोहच्या घनदाट जंगलात वाघाने केलेल्या शिकारीत गाय आणि गौरी ठार झाल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून घटनास्थळावर वन विभागाची चमु दाखल झाली आहे. तुमसर तालुक्यातील वनविभागाच्या सोनेगाव कंपार्टमेंट ३ मधील घनदाट जंगल सध्या एका थरारक आणि गंभीर घटनेमुळे चर्चेत आले आहे.

२८ नोव्हेंबरच्याच्या सायंकाळी एका वाघाने केलेल्या भीषण हल्ल्यात एक गाय आणि तिचा गोन्हा (वासर), असे दोन पाळीव प्राणी ठार झाले आहेत. याघटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये आणि पशुपालकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. पशुधन चारण्यासाठी गेलेल्या गायी-गोन्ह्यांवर हा हल्ला करण्यात आला. सायंकाळच्या वेळी, वाघाने दबा धरून बसून अचानक हल्ला केला असावा, असा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे. हल्ल्याची ही घटना इतकी भीषण होती की गाय आणि गोन्हा या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *