स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची गळफास लावून आत्महत्या

तुमसर :- शहरातील तुमसर बजाज नगर मधील आशिष मनोहर वनवे (३९) यांनी घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी पहाटे दरम्यान उघडकीस आली. घटनेच्या दिवशी आशिष वनवे हे घरातील सर्व लोक झोपेत असताना त्यांनी घरच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. आशिष वनवे हे तुमसर पंचायत समिती कार्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूपश्चात एक मुलगा, एक मुलगी, आई वडील असा बराच मोठा आप्त परिवार आहे. वृत्तलिहोस्तर आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. आशिष वनवे यांच्या मृत्यूने तुमसर शहरात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *