अवैध आढळलेली रेती घरकुल लाभार्थीना वाटप
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील खडकी रस्त्यावर अवैध रेती आढळल्याने पालोरा साझाचे महसूल अधिकारी प्रिया ठवकर यांनी सहा ब्रास रेतीचा पंचनामा करून अहवाल सादर करून तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अधिकारी प्रिया ठवकर, सरपंच अश्विन बागडे कोतवाल अनिल वैद्य, बादल तिरपुडे, मुलचंद उरकुडे यांच्या उपस्थितीत प्रत्येकी सहा ब्रास घरकुल लाभार्थी ना रेती वाटप करण्यात आले.









