तहसीलदार लाखनी यांना स्वर्णकार समाजाचे निवेदन
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- लाखनी येथील अखिल भारतीय स्वर्णकार समाज यांच्या माध्यमातून तहसीलदार लाखनी यांना अत्याचारी नराधम आरोपीला तात्काळ अटक करून फाशी देण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. प्रकरण असे की मालेगाव डोंगराळे जिल्हा नाशिक येथील तीन वर्षीय चिमुकली वर अत्याचार करून तिची निघर्ृण हत्या करण्यात आलेली होती.
या प्रकरणात शासनाने कठोर पावले उचलावीत. कायद्याच्या कचाट्यात वेळ न घालवता या अत्याचारी नराधमाला तात्काळ फाशी देण्यात यावी अशा मागणीसाठी लाखनी तालुका सुवर्णकार समाजातर्फे लाखनी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेले आहे. यावेळी स्वर्णकार समाजाचे सुभाष कावळे, कांचन कावळे, अंगेश बेहलपाडे, विजय डुंभरे, संजय हर्षे, सुभाष ढोमणे, सतीश येवले, संजय डुंभरे, अश्विन बांगरे, किशोर फाये, प्रफुल्ल करंडे, नितीन ढोमणे, राजेंद्र म्हस्के, सागर कावळे, आदित्य म्हस्के, प्रशांत म्हस्के, इत्यादी उपस्थित होते.









